1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शनिवार, 14 फेब्रुवारी 2026 (18:33 IST)

पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात सहा आरोपींवर आरोप निश्चित

Vaishnavi Hagavane
पुण्यातील वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात सत्र न्यायालयाने या प्रकरणातील सहा आरोपींवर आरोप निश्चित केले असून खटल्याची नियमित सुनावणी येत्या 23 फेब्रुवारी पासून सुरु होणार आहे. 
पिंपरी चिंचवड पोलिसांनी 14 जुलै रोजी एकूण 11 जणांविरोधात चार्जशीट दाखल केले होते. वैष्णवी यांच्या मृत्यू नंतर 58 दिवसांनी सादर करण्यात आलेल्या आरोपपत्रात राजेंद्र हगवणे, त्यांची पत्नी, दोन मुले, एक मुली आणि इतर सहा जणांचा सहभाग होता. सत्र न्यायालयाने या सहा जणांविरुद्ध गंभीर आरोप निश्चित केले आहे. 
या सहा आरोपींमध्ये वैष्णवीचे पती शशांक हगवणे, सासू लता हगवणे, नणंद करिश्मा हगवणे, सासरे राजेंद्र हगवणे, दीर सुशील हगवणे आणि कुटुंबीय मित्र निलेश चव्हाण यांचा समावेश आहे.
काय आहे प्रकरण 
16 मे 2025 रोजी पुणे जिल्ह्यातील भुकूम येथे वैष्णवी हगवणेचा मृतदेह तिच्या सासरी घरात पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला. पोलिसांना सुरुवातीला हे प्रकरण आत्महत्याचे वाटले मात्र वैष्णवीचा शवविच्छेदन  अहवालात तिच्या शरीरावर जखमांच्या खुणा आढळल्या. या मुळे संशय बळकावला.हे प्रकरण आत्महत्या की घातपात असे प्रश्न निर्माण झाले आणि हे प्रकरण राज्यभरात प्रचंड गाजले. 
17 मे रोजी वैष्णवीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर पोलिसांनी सखोल तपास करत जुलै महिन्यात सत्र न्यायालयात सविस्तर आरोपपत्र सादर केले. आणि सर्व आरोपींवर हुंडाबळी, आत्महत्येस प्रवृत्त करणे, शारीरिक व मानसिक छळ, मारहाण, गुन्हेगारी, कट रचणे, पुरावे नष्ट करण्याचे आरोप निश्चित केले आहे. 
 
खटल्याची प्रक्रिया अधिकृतपणे पुढे सरकली आहे. 23 फेब्रुवारी पासून नियमित सुनावणी सुरु होणार असून या  प्रकरणात पुढील टप्प्यात साक्षीदारांची साक्ष, पुरावे आणि युक्तिवाद यांना सुरुवात होण्याची शक्यता आहे.
  Edited By - Priya Dixit