शनिवार, 7 फेब्रुवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शनिवार, 10 जानेवारी 2026 (11:10 IST)

पिंपरी चिंचवड मध्ये 12 माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांची ठाकरे गटातून हकालपट्टी

uddhav thackeray
अवघ्या काहीच दिवसांवर महानगरपालिकेच्या निवडणूक होणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात राजकीय खळबळ उडाली आहे. शिवसेना ठाकरे गटातून 12 माजी नगरसेवक व पधाधिकाऱ्यानी हकालपट्टी करण्यात आली आहे.
ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख अँड गौतम चाबुकस्वार यांनी गुरुवारी अधिकृत पत्रक काढून सदर कारवाई केली.
गेल्या काही दिवसांपासून पिंपरी -चिंचवडचे माजी नगरसेवक व पदाधिकारी पक्षांतर करत आहे. ते आपल्या पक्षाच्या उमेदवारांच्या विरोधात काम करून पक्षाला नुकसान करत असल्यामुळे या माजी पदाधिकारी व नगरसेवकांची पाशातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

या मध्ये धनंजय आल्हाट (माजी नगरसेवक),सचिन भोसले (माजी नगरसेवक तथा माजी शहरप्रमुख),रुपाली आल्हाट (शहरप्रमुख, महिला आघाडी)
इतर पदाधिकारी: राहुल गवळी, कुणाल तापकीर, दादा नरळे, सचिन सानप, नेताजी काशिद, संतोष वाळके, गजानन धावडे, शिवाजी कुऱ्हाडकर यांचा समावेश आहे. यांना पक्षाच्या बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.
“पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांना पुन्हा स्थान मिळणार नाही,” असा सज्जड दमही जिल्हाप्रमुखांच्या पत्रातून देण्यात आला असून पक्षातून काढण्यात आले आहे. .
Edited By - Priya Dixit