पुण्यातील कात्रज डेअरी आता ओळखली जाणार ‘अजितदादा पवार’ यांच्या नावाने!
Photo credit : katraj dairy pune
राज्यातील दिवंगत उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्यातील पालकमंत्री अजित पवार यांचे अकाली जाणे राज्यातील प्रत्येक नागरिकांसाठी धक्कादायक आहे. त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने एक मोठा व ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.
पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने आपल्या कात्रज डेअरी संस्थेचे नाव बदलून आता अजितदादा पवार पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ, कात्रज असे करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला आहे.
संस्थेचे अध्यक्ष ॲड. स्वप्नील ढमढेरे यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची एक बैठक नुकतेच पार पडली. या बैठकीत अजितदादांच्या आठवणींना टिकवण्यासाठी सूड संघाला अजित दादांचे नाव देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला असून बैठकीत सर्व संचालकांनी या निर्णयाला पाठिंबा दिला.
अजित दादांच्या निधनांनंतर त्यांचे भव्य स्मारक बारामतीत उभे करण्याची चर्चा सुरु असताना पुण्यातील कात्रज दुग्ध संघाकडून हा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. यामुळे सहकार क्षेत्रात अजितदादांचे नाव कायमस्वरूपी अग्रक्रमाने घेतले जाणार आहे. लवकरच या निर्णयाची रीतसर प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण केली जाणार असून, नामकरणाचा अधिकृत सोहळा पार पडणार आहे.
Edited By - Priya Dixit