Maharashtra kesari 2026 : पुण्यात महाराष्ट्र केसरी साठी 1500 मल्ल भिडणार
राज्यातील कुस्तीशौकीन गदा आणि मानाच्या महाराष्ट्र केसरी किताबासाठी सज्ज झाले असून यंदा 1500 मल्ल महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत लढणार आहे. यंदा पुण्यात विजेता मालकांवर पुरस्कारांचा वर्षाव होणार आहे. यंदा विजेता मल्लांना रोख रकमेसह आकर्षक बक्षिसे मिळणार आहे.
कुस्ती महर्षी मामासाहेब मोहोळ यांच्या पवित्र स्मृतीखातर दिली जाणारी महाराष्ट्र केसरीची मानाची गदा यंदा केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या वतीने प्रदान केली जाणार आहे. तसेच मानाच्या गदेसह विजेताला 35 ते 40 लाख रुपयांची फॉर्च्युनर गाडी देखील बक्षीस स्वरूपात मिळणार आहे.
या भव्य बक्षिसांमुळे राज्यातील 1500 मल्लांमध्ये विजेतेपदासाठी मोठी चुरस पाहायला मिळणार असून, कुस्तीप्रेमींमध्येही या स्पर्धेबाबत प्रचंड उत्साह दिसून येत आहे.
पुणे जिल्ह्यातील वाघोली येथे 18 मार्च ते 22 मार्च काळात 68 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे भव्य आयोजन केले जाणार आहे. या स्पर्धेसाठी वाघोलीत सध्या जय्यत तयारी सुरु आहे.
राज्याच्या क्रीडा क्षेत्रातील स्व. अजितदादा पवार यांच्या अतुलनीय योगदानाचा सन्मान म्हणून या संपूर्ण क्रीडा परिसराला स्व. अजितदादा पवार क्रीडानगरी असे नाव देण्यात आले आहे. पाच दिवस चालणाऱ्या या कुस्ती उत्सवात राज्यातील पैलवान एकमेकांशी लढणार आहे. कुस्ती शौकिनांसाठी ही एक मोठी मेजवानी ठरणार आहे.
स्पर्धेचे उद्घाटन 18 मार्च रोजी राज्याच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धा 2026 चे उदघाटन उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. तर, 22 मार्च रोजी समारोप व बक्षीस वितरण सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत.
Edited By - Priya Dixit