1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: बुधवार, 25 फेब्रुवारी 2026 (14:37 IST)

शरद पवार यांची प्रकृती उत्तम; हॉस्पिटलमधून डिस्चार्ज केलं

sharad pawar
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत मोठी आणि दिलासादायक अपडेट समोर आली आहे.प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपचार घेत असलेल्या शरद पवारांना आज रुबी हॉल क्लिनिकमधून डिस्चार्ज देण्यात आला असून ते मुंबईला रवाना झाले आहेत. डॉ. परवेज ग्रँड यांनी पवारांच्या प्रकृतीबाबत सविस्तर माहिती दिली.
रुबी हॉल क्लिनिकचे मुख्य हृदयरोगतज्ज्ञ, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. परवेझ ग्रँट यांनी माहिती दिली की, “पवार साहेबांची प्रकृती आता उत्तम असून त्यांना डिस्चार्ज केलं आहे. पवार साहेबांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी रुग्णालय प्रशासनाने शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.
पवार साहेबांना पाण्याची कमतरता झाल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना सलाइनद्वारे उपचार दिले गेले. त्यांची प्रकृती आता उत्तम आहे. आणि काळजी सारखे काहीच नाही. त्यांना पुढील दोन ते तीन दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. त्या नंतर ते कामाला सुरुवात करू शकतील. असे डॉक्टर म्हणाले.