पुणे जमीन घोटाळा प्रकरणी व्यवहार रद्द करण्यासाठी 21 कोटींचा मुद्रांकशुल्क भरावा लागणार
पुणे जमीन घोटाळा प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे अडकले असून अजित पवारांनी जमीन व्यवहार रद्द करण्याची घोषणा केल्यांनतर आता पार्थ पवार हे अडचणीत आले आहे.
त्यांनी अमेडीया कंपनीचे व्यवहार रद्द करण्यासाठी नोंदणी कार्यालयात अर्ज दाखल केला असून आता या व्यवहार रद्द करण्याच्या प्रक्रियेसाठी कंपनीला 21 कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क भरण्याची अट सह दुय्यम निबंधक कार्यालयाने घातली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे 300 कोटीं रुपयांच्या व्यवहारावर 7 टक्के दराने कर आकारला जाणार आहे. या मध्ये 5 टक्के मुद्रांक शुल्क , 1 टक्के स्थानिक संस्था कर, आणि 1 टक्के मेट्रो कर समाविष्ट आहे.
पार्थ पवार यांना व्यवहार रद्द करण्यापूर्वी 21 कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क जमा करावे लागणार असे निबंधक कार्यालयाने स्पष्ट केले आहे. या आदेशामुळे पार्थ पवार यांच्या अडचणी वाढल्या आहे.
Edited By - Priya Dixit