1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
  4. Wife commits suicide by jumping from the eighth floor of a building in Pune

पुण्यात पतीसोबत झालेल्या भांडणानंतर इमारतीच्या आठव्या मजल्या वरून उडी घेऊन पत्नीची आत्महत्या

पुण्यातील एका महिलेने पतीसोबत झालेल्या भांडणानंतर इमारतीच्या आठव्या मजल्यावरून जीवघेणी उडी घेतली. तिने काही काळ बाल्कनीचे रेलिंग धरून ठेवले होते. लोकांनी तिला वाचवण्यासाठी आरडाओरडा केला, पण पाहता पाहता तिचा हात निसटला आणि ती खाली कोसळली त्यातच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार ही घटना पुण्यातील तळेगाव एमआयडीसी परिसरामधून असून   पतीसोबत झालेल्या भांडणानंतर तिने हे भयानक पाऊल उचलल्याचे वृत्त आहे. मृत महिलेची ओळख प्रतिभा शंकर अशी पटली आहे. असे वृत्त आहे की, घटनेपूर्वी प्रतिभा आणि तिच्या पतीमध्ये जोरदार वाद झाला होता. वाद विकोपाला गेला आणि संतापलेल्या त्या महिलेने बाल्कनीतून उडी मारली. आठव्या मजल्यावरून खाली पडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आला. 
Edited by-Dhanashri Naik
About Writer
वेबदुनिया न्यूज टीम
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा
पुढील लेख
10th results कमी गुणांमुळे तणावाखाली येऊन विद्यार्थ्यांची आत्महत्या; धाराशिव मधील घटना