सुरगाणा राक्षसभुवन येथे विवाह समारंभात पाहुण्यांना ११०० केशर आंबा रोपांची भेट

mango
Last Modified शनिवार, 21 मे 2022 (08:08 IST)
विवाह सोहळ्यातील अनिष्ट प्रथांना फाटा देत तालुक्यातील राक्षसभुवन येथील भुसारे परिवाराने व-हाडींना अकराशे आम्र वृक्षांची भेट देऊन निसर्ग संवर्धनाचा वसा जपल्याने वृक्ष प्रेमीनी भुसारे परिवाराचे अभिनंदन केले आहे. विवाह सोहळ्यात

कपडे, दागदागिने, अनावश्यक भेट वस्तू
एकमेकांना देऊन स्वागत केले जाते. त्यामुळे अनावश्यक खर्चाला फाटा देत पाहुण्यांना कायम स्मरणात राहावा यासाठी केशर आंब्याची अकराशे रोपं भेट म्हणून देण्यात येऊन वृक्ष तसेच फळझाडांचे संवर्धन करण्याचा संदेश दिला. फळझाडांचे वाटप करुन कमी खर्चात ह्या विवाह सोहळ्याचे मुख्य उद्दिष्ट राक्षसभुवन येथील जनार्दन भुसारे यांनी त्यांच्या लहान भाऊ व बहीण यांच्या विवाह समारंभात ठेवले होते. कुठल्याही प्रकारचा आहेर न स्विकारता बहिण व भावाकडील सासरच्या मंडळींना तसेच स्वकियांना गुजरात मधून आणलेली केशर आंब्याची ही रोपे भेट देऊन एक चांगला आदर्श समाजापुढे ठेवला आहे.
दोन वर्षे राज्यावर कोरोनाचे
सावट होते. या दुष्काळात शेतकरी होरपळून निघाला होता. त्यातच मागील खरिपात त्यास अतिवृष्टीने झोडपले. रब्बी हंगामातील गारपीटीच्या माऱ्याने तर तो पार उध्वस्त झाला होता. हुंडा, कन्यादान सर्व भेटवस्तूंची देण्याची पडलेली प्रथा, मानापानाचे आहेर तसेच समाजाच्या दबावाखाली लग्न थाटामाटात करण्याच्या मानसिकतेमुळे हा खर्च प्रचंड वाढला आहे. प्रतिकुल नैसर्गिक परिस्थितीत बहुतांश शेतकरी कुटुंबांना लग्नाचा वाढता खर्च झेपावेनासा झाला आहे. त्यामुळे एक तर कर्जबाजारी होऊन अथवा शेतीचा तुकडा विकून लग्न सोहळा पार पाडला जातो.
लग्नसोहळ्यात अनिष्ट प्रथा अनावश्‍यक मानापानावर आता मर्यादा आणाव्या लागतील. अत्यंत आटोपशीर खर्चात हा सोहळा पार पाडणे हे शेतकरी कुटुंबास भविष्यात अधिक हिताचे ठरेल. दुर्गम भागातील राक्षसभुवन येथील भुसारे कुटुंबाने लग्नकार्यात कुठलाही आहेर किवा भेट वस्तु
स्विकारली नाही. उलट व-हाडी मंडळींना आम्र वृक्षांची भेट देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी जल परिषदेचे सदस्य देविदास कामडी, योगेश महाले, हिरामण चौधरी, लक्ष्मण गायकवाड, संजय चव्हाण, हेमराज गावित आदी उपस्थित होते.


यावर अधिक वाचा :

महाराष्ट्र बेरोजगरी भत्ता मिळवण्यासाठी अर्ज कसा करावा ...

महाराष्ट्र बेरोजगरी भत्ता मिळवण्यासाठी अर्ज कसा करावा Maharashtra Berojgari Bhatta
महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजनेच्या माध्यमातून राज्यातील सर्व बेरोजगार सुशिक्षित ...

वीज पुरवठा खंडित झाल्याने व्हेंटिरेटरवरील रुग्णाचा मृत्यू?

वीज पुरवठा खंडित झाल्याने व्हेंटिरेटरवरील रुग्णाचा मृत्यू?
करविर तालुक्यातील उचगाव येथील ओेमेश काळे यांना घरातच व्हेंटिलेटर लावले होते. पण वीज ...

राज्यसभा निवडणूक 2022 : भाजपानं महाराष्ट्रात केडरपेक्षा ...

राज्यसभा निवडणूक 2022 : भाजपानं महाराष्ट्रात केडरपेक्षा बाहेरुन आलेल्यांना संधी का दिली?
परप्रांतीय उमेदवाराला महाराष्ट्रातली राज्यसभेची जागा दिली म्हणून कॉंग्रेस पक्षांतर्गत आणि ...

लॉर्ड्स स्टेडिअममध्ये मॅच थांबवली, लॉर्ड्सच्या कॉमेंट्री ...

लॉर्ड्स स्टेडिअममध्ये मॅच थांबवली, लॉर्ड्सच्या कॉमेंट्री बॉक्सला शेन वॉर्न या नावाने ओळखले जाईल
क्रिकेटचा मक्का म्हटल्या जाणाऱ्या लॉर्ड्सच्या मैदानावर इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील ...

मुंबईत आजपासून दुचाकीवर मागे बसणाऱ्यालाही हेल्मेटसक्ती ...

मुंबईत आजपासून  दुचाकीवर मागे बसणाऱ्यालाही हेल्मेटसक्ती झाली सुरु; नियम तोडला तर इतका दंड
मुंबई पोलिसांनी हेल्मेट वापरासंबंधी नवी नियमावली जारी केली असून आता केवळ दुचाकीचालकच ...

1 जुलैला देवेंद्र फडणवीस घेऊ शकतात मुख्यमंत्रिपदाची शपथ, ...

1 जुलैला देवेंद्र फडणवीस घेऊ शकतात मुख्यमंत्रिपदाची शपथ, शिंदे गटाकडे लक्ष
उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यामुळे महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापनेचा मार्ग जवळपास मोकळा झाला ...

उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्रिपदाचा आणि आमदारकीचा राजीनामा

उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्रिपदाचा आणि आमदारकीचा राजीनामा
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला आहे. काही क्षणांपूर्वीच त्यांनी ...

पुणे-संगमनेर-नाशिक सेमी हायस्पीड प्रकल्पासाठी हालचालींना ...

पुणे-संगमनेर-नाशिक सेमी हायस्पीड प्रकल्पासाठी हालचालींना वेग ; केंद्रीय मंत्री मंडळ घेणार मोठा निर्णय
रेल्वे मंत्रालयाने मागच्या काही दिवसांपूर्वी पुणे-संगमनेर- नाशिक मार्गावर वेगवान ...

एकनाथ शिंदे बंड :उद्या 11 वाजताच होणार बहुमताची चाचणी, ...

एकनाथ शिंदे बंड :उद्या 11 वाजताच होणार बहुमताची चाचणी, सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय
सुप्रीम कोर्टाने उद्या बहुमत चाचणी घेण्याचा निर्णय दिला आहे. न्या. सूर्यकांत कौल आणि ...

विजेचा धक्कासख्ख्या भावांचा मृत्यू

विजेचा धक्कासख्ख्या भावांचा मृत्यू
शेडला अडकवलेली दुधाची बादली घेताना विजेचा धक्का बसून सख्ख्या भावांचा मृत्यू झाला आहे. ...