लोणावळ्यात टायगर पॉईंटच्या खोल दरीत मुंबईतील तरुणीचा पडून मृत्यू
लोणावळ्यातील टायगर पॉईंट परिसरात ट्रेकिंसाठी आलेल्या मुंबईतील एका 19 वर्षीय तरुणीचा 390 फूट खोल दरीत पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मृत तरुणीचे मृतदेह लोणावळ्यातील शिवदुर्ग मित्र रेस्क्यू टीमने रविवारी शोध मोहीम राबवून बाहेर काढले. श्रेया पटी असे या मृत तरुणीचे नाव आहे.
सदर घटना 31 जानेवारी रोजीची आहे. या दिवशीश्रेया लोणावळ्यातील ड्युक्स नोज परिसरात ट्रेकिंगसाठी आली होती. सायंकाळी ती घरी परतली नाही म्हणून कुटुंबीयांनी तिचा शोध घेण्यासाठी लोणावळ्याची धाव घेतली आणि शोध मोहीम सुरु केली.
रविवारी सकाळी टायगर पॉईंट परिसरात एक बेवारस बॅग सापडली जी श्रेयाची होती.नंतर लोणावळा ग्रामीण पोलिसांनी शोध मोहिमेसाठी रेस्क्यूटीमची मदत मागितली.
लोणावळ्यातील शिवदुर्ग रेस्क्यू टीमचे पथक दुपारी टायगर पॉइंटला पोहोचले आणि शोध मोहीम सुरु केली. सुरुवातीला डॉग स्कॉडच्या आणि पोलीस ड्रोनच्या साहाय्याने शोध सुरु केली नंतर पुण्यातील लायटनिंगड्रोनच्या साहाय्याने तपास केला असता त्यात सायंकाळी दरीत एका मुलीचा मृतदेह असल्याचे स्पष्ट झाले.
मुलीचा मृतदेह 390 फूट दरीत अडकल्याने ते काढणे आव्हानात्मक होते. रात्रीच्या अंधारात आणि डोंगर भाग असून रेस्क्यूटिमच्या दोन सदस्य दोरीच्या साहाय्याने खोल दरीत उतरले आणि रात्री 9:30 वाजण्याच्या सुमारास मुलीचे मृतदेह वर काढले.सदर घटना आत्महत्या आहे की अपघात की घातपात पोलीस याचा तपास लावत आहे.
Edited By - Priya Dixit