शुक्रवार, 17 एप्रिल 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : मंगळवार, 17 मार्च 2026 (15:18 IST)

नाशिकच्या तपोवन परिसरात जादूटोणा प्रकार; झाडांवर फोटो लावून खिळे ठोकल्याचा अघोरी प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली

nailed to a tree
नाशिकच्या पवित्र तपोवन परिसरात समोर आलेला हा प्रकार अत्यंत धक्कादायक आणि अघोरी आहे. कुंभमेळ्याची भूमी आणि तपोभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या भागात अशा प्रकारच्या कृत्यांमुळे नागरिकांमध्ये संताप आणि भीतीचे वातावरण आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार तपोवन परिसरातील काही झाडांना अज्ञात व्यक्तींनी खिळे ठोकून त्यावर लोकांचे फोटो अडकवले होते. काही फोटोंवर लिंबू, काळी बाहुली आणि शेंदूर लावलेले आढळून आले.  हे सर्व प्रकार गोदावरी काठावरील निर्जन भागात आणि दाट झाडी असलेल्या परिसरात करण्यात आले होते.
 
सकाळी फिरण्यासाठी गेलेल्या काही जागरूक नागरिकांना आणि पर्यावरण प्रेमींना हे दृश्य दिसले, त्यानंतर त्यांनी तातडीने पोलिसांना आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (ANiS) कार्यकर्त्यांना पाचारण केले. कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेत हे सर्व साहित्य गोळा केले.
पोलिसांनी या प्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
झाडांना खिळे ठोकल्यामुळे वृक्षांचे नुकसान होत असल्याने पर्यावरण प्रेमींनीही यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. तपोवन सारख्या वर्दळीच्या आणि धार्मिक ठिकाणी रात्रीच्या वेळी अशा हालचाली कशा होतात, असा प्रश्न उपस्थित करत रात्रीची गस्त वाढवण्याची मागणी केली जात आहे.
Edited By- Dhanashri Naik