कार थेट २० फूट खाली कोसळली! मुंबईहून समृद्धी महामार्गाने गावी निघलेल्या माय-लेकीचा जागीच दुर्दैवी मृत्यू
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर रविवारी भीषण अपघात घडला. या अपघातात आई आणि लेकीचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
सदर अपघात लासूर स्टेशनजवळ डोणगाव परिसरात कारचे टायर फुटून कार अनियंत्रित होऊन महामार्गाच्या सुरक्षा कठड्याला जाऊन धडकली आणि पुलावरून २० फूट खाली कोसळली आणि अपघातग्रस्त झाली. या अपघातात कारमधील बसलेल्या आई आणि लेकीचा जागीच मृत्यू झाला.
मुंबईहून अमरावतीकडे एक कुटुंब कार ने प्रवास करताना समृद्धी महामार्गावर कारचे टायर फुटले आणि कार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार महामार्गाच्या पुलाच्या सुरक्षा कठडेला जाऊन आदळली आणि सुरक्षा कठडा तोडून थेट पुलावरून २० फूट खाली कोसळली.या अपघातात कार मधील दोघींचा जागीच मृत्यू झाला तर इतर पाच जण गंभीर जखमी झाले.
अपघातानंतर खळबळ उडाली स्थानिकांनी आणि महामार्गावरील इतर नागरिकांनी तातडीने मदत देण्यास सुरु केले आणि अपघातात जखमी झालेल्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. अपघातात जखमी झालेल्यांपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितलं जात आहे.
घटनेची माहिती पोलिसांना, मागमार्ग सुरक्षा पथकांना देण्यात अली सून अपघातग्रस्त वाहन पुलाखालून बाहेर काढण्यासाठी विशेष यंत्रणाची मदत घ्यावी लागली. या अपघातामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली. पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, कारचे टायर फुटल्याने कारचा अपघात झाल्याचे समजले. पोलीस पुढील तपास करत आहे.
Edited By - Priya Dixit

