वारंवार भूकंपाच्या धक्क्यांचा वैज्ञानिक अभ्यास करण्यासाठी केंद्र सरकारचे तज्ज्ञ पथक नाशिकमध्ये दाखल होणार
नाशिकमध्ये सुरू असलेल्या भूकंपाच्या धक्क्यांचा वैज्ञानिक अभ्यास करण्यासाठी केंद्र सरकारचे एक तज्ज्ञ पथक दाखल होणार आहे. अत्याधुनिक निरीक्षण उपकरणांच्या साहाय्याने गोळा केलेला डेटा थेट दिल्लीला पाठवला जाईल. अशी माहिती समोर आली आहे.
राजकीय घडामोडींचे केंद्र म्हणून ओळखले जाणारे दिल्ली आता नाशिकमधील भूकंपाच्या धक्क्यांवर लक्ष ठेवणार आहे. भारत सरकारच्या भूविज्ञान मंत्रालयांतर्गत असलेले राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्र जिल्ह्यात होणाऱ्या भूकंपांच्या मालिकेचा वैज्ञानिक अभ्यास करणार आहे. या पार्श्वभूमीवर, भूविज्ञान मंत्रालयाचे एक तज्ज्ञ पथक नाशिकमध्ये दाखल होणार आहे. भूकंपग्रस्त भागांमध्ये अत्याधुनिक निरीक्षण उपकरणे बसवण्यात येतील, ज्यातून मिळणारी माहिती थेट दिल्लीतील नियंत्रण केंद्राला पाठवली जाईल. गेल्या आठवड्यात दिंडोरी, सुरगाणा, कळवण, पेठ आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यात जाणवलेल्या सौम्य भूकंपाच्या धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. गेल्या सात दिवसांत जिल्ह्यात एकूण १२ भूकंपाचे धक्के नोंदवले गेले आहे.
हे पथक भूकंपग्रस्त भागांची पाहणी करून भूवैज्ञानिक परिस्थिती, भूकंपाच्या धक्क्यांची कारणे, भूवैज्ञानिक हालचाली आणि आवश्यक उपाययोजनांचा अभ्यास करेल.
Edited By- Dhanashri Naik

