हिवाळी अधिवेशनात साताऱ्यातील फलटणच्या महिला डॉक्टर आत्महत्येचा मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली
विधानसभा हिवाळी अधिवेशनात आज साताऱ्यातील फलटणच्या महिला डॉक्टर आत्महत्याचा मुद्दा चर्चेत होत. विरोधकांनी या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना जाब विचारल्यावर त्यांनी या प्रकरणाची सविस्तर माहिती सादर केली. ते म्हणाले, या प्रकरणात तात्काळ एसआयटीची नियुक्ती केली असून न्यायालयीन चौकशी सुरु असल्याचे सांगितले.
फॉरेन्सिक अहवालानुसार, महिला डॉक्टर ने आपल्या हातावर सुसाईड नोट लिहून गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर आरोप झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले. विरोधकांनी सरकारी हस्तक्षेपाचा आरोप केला आणि हा मुद्दा सभागृहात मांडला.
या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र यांनी आज अधिवेशनात या प्रकरणेच्या तपासाबाबत सविस्तर माहिती दिली.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, तपासात पोलीस अधिकारी बदने याने संबंधित डॉक्टरची फसवणूक केली आणि तिच्यावर शारीरिक अत्याचार केला. लग्नाचे आमिष दाखवून त्याने फसवणूक केली. या परिस्थितीचा फायदा घेत दुसऱ्या आरोपीने देखील महिलेची फसवणूक केली.
महिला डॉक्टरानी दोन्ही आरोपींची नावे आत्महत्येपूर्वी हातावर लिहिली होती. या प्रकरणी बदने आणि दुसऱ्या आरोपीने महिलेची फसवणूक केल्याने तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे फॉरेन्सिक अहवालात स्पष्ट झाले आहे. तसेच तळहातावरील अक्षरे महिलेचेच आहे. प्रकरणाचा तपास सुरु असून चार्जशीट शेवटच्या टप्प्यात आहे. प्रकरणाचा तपास आयपीएस महिला अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली सुरु असून न्यायमूर्तींच्या देखरेखीखाली स्वतंत्र चौकशी सुरु आहे.
डिजिटल आणि तांत्रिक पुरावे देखील पोलिसांच्या ताब्यात आहे. पोलिसांकडे व्हॉट्सअॅप चॅट आहे तसेच शेवटच्या दिवशी महिला डॉक्टर हॉटेल मध्ये आल्या, रूम मध्ये गेल्याच सीसीटीव्ही फटेज देखील पोलिसांकडे आहे. कोण आले आणि गेले याची माहिती देखील पोलिसांकडे असल्याचं मुख्यमंत्री यांनी सांगितलं .
प्रकरणात आरोपींच्या व्यतिरिक्त अजून कोणी सहभागी आहे का. नवीन कायद्यानुसार आवश्यक तांत्रिक पुरावे गोळे करण्यात आले आहे. या साठी न्ययालयीन चौकशी सुरु असून कायद्यानुसार 60 दिवसांत चार्जशीट दाखल करणे अपेक्षित असून ती जवळपास पूर्ण झाली असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
Edited By - Priya Dixit