मोठी बातमी! उपमुख्यमंत्री अजित पवारांचा विमान अपघातात दुर्देवी मृत्यू, राज्यात शोककळा
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज सकाळी बारामतीत विमान लेन्डिंग दरम्यान अपघातग्रस्त होऊन दुर्देवी निधन झाले. या विमान अपघातात अजित पवारांसह एकूण सहा जणांचा मृत्यू झाला आहे. अजित पवार आज बारामतीत निवडणूक प्रचारसभाला संबोधित करण्यासाठी मुंबईहून बारामतीकडे निघाले होते.
बारामतीत विमानाची लँडिंग करताना विमान कोसळून अपघात झाला. या घटनेची माहिती मिळतातच खासदार सुप्रिया सुळे, अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार आपले सर्व कार्यक्रम रद्द करून तातडीने बारामतीच्या दिशेने निघाल्या आहेत.
अपघाताचे वृत्त मिळतातच सुप्रिया सुळे एका बैठकीत होत्या. बातमी कळतातच त्या भावुक झाल्या आणि तातडीने बारामतीच्या दिशेने निघाल्या.
या दुर्घटनेनंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी Devastated असा एकच शब्द वापरून आपली भावना व्यक्त केली. त्यांनी व्हॉट्सॲप स्टेटसच्या माध्यमातून ही प्रतिक्रिया दिली आहे.
राज्यात अजित पवारांच्या निधनाची बातमी मिळतातच बारामतीत आणि राज्यात शांतता आणि शोककळा पसरली असून बाजारपेठ बंद केले. अजित पवारांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बारामतीतील निवासस्थानाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.
त्यांच्या अकाली आणि धक्कादायक एक्झिटमुळे संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली असून, राजकारणात मोठी नेतृत्वाची पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
Edited By - Priya Dixit