1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. Horrific accident involving vehicles in Manoj Jarange's convoy

मनोज जरांगेंच्या ताफ्यातील वाहनांचा भीषण अपघात

सध्या मनोज जरांगे हे पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे. आज पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्याच्या समारोप करताना त्यांचे स्वागत करण्यात आले या साठी ढोलताशा झांज पथक आणि ३० जेसीबी पुष्पवृष्टी करण्यासाठी आले होते.
या वेळी त्यांचे स्वागत करण्यासाठी प्रचंड गर्दी उसळली होती. या गर्दीमुळे जरांगे पाटील यांच्या ताफ्यातील दोन ते तीन गाड्या एका बसला धडकला. या अपघातात एका कार्यकर्त्याला किरकोळ दुखापत झाली. सुदैवाने या मध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. 
आज सांगलीतील विटा शहराकडे मनोज जरांगे यांचा ताफा आला असता त्यांच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी उसळून आली. गर्दीमुळे त्यांच्या वाहनाला बसचा धक्का लागला आणि अपघात घडला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. एका कार्यकर्त्याला किरकोळ दुखापत झाली असून त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे. 
 
Edited By - Priya Dixit 
पुढील लेख
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी वंदे मातरम विधेयकाला मंजुरी दिली, अपमान करणाऱ्यांना दंड होणार