मंगळवार, 10 फेब्रुवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : सोमवार, 29 डिसेंबर 2025 (09:50 IST)

पुणे-पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार, युतीची अजित पवारांची मोठी घोषणा

Pune-Pimpri Chinchwad
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी पिंपरी चिंचवडमध्ये होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) यांच्यात युतीची घोषणा केली आहे. त्यांनी निवडणूक व्यासपीठावरून ही घोषणा केली. उमेदवारांची यादी अंतिम करताना आम्ही एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. 
पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुका काहीच दिवसांवर आल्या आहेत. या पार्शवभूमीवर सर्व पक्ष तयारीला लागले आहे. अजित पवारांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याचा म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची युतीची मोठी घोषणा केली आहे. हे दोन्ही पक्ष एकत्र निवडणूक लढवणार आहे. 
आता घड्याळ आणि तुतारी हे चिन्ह एकत्रच निवडणुकीच्या मैदानात उतरणार असून राष्ट्रवादी मतांची विभागणी थांबण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 
 
पिंपरी चिंचवड मध्ये बोलताना अजित पवार म्हणाले, कुटुंब पुन्हा एकत्र येत आहे. असं म्हणत त्यांनी  हा निर्णय कार्यकर्त्यांच्या आणि मतदारांच्या भावनेशी जोडलेला असल्याचे संकेत दिले.
 भाजपने पिंपरी-चिंचवडमध्ये स्वबळावर लढण्याचा निर्धार ( NCP) व्यक्त करत ‘125 पार’चा नारा दिला आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्याने भाजपच्या या दाव्यांना जोरदार आव्हान निर्माण झाले आहे. राष्ट्रवादीकडून भाजपच्या “अति आत्मविश्वासाला” प्रत्युत्तर देण्याची तयारी सुरू केली आहे. 
ठाकरे बंधूंची युती झालीच आहे. आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याने महापालिका निवडणुका अधिकच चुरशीची होणार आहे. 
Edited By - Priya Dixit