रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : शनिवार, 31 ऑगस्ट 2024 (16:10 IST)

Nashik :रेल्वेत गोमांस वाहून नेण्याच्या संशयावरून वृद्धाला मारहाण, व्हिडिओ व्हायरल

train
नाशिक मध्ये इगतपुरीजवळ एका एक्स्प्रेस ट्रेन मध्ये गोमांस घेऊन जात असल्याच्या संशयावरून एका वृद्ध व्यक्तीवर सहप्रवाशानी हल्ला केल्याची घटना घडली आहे. 
 
शासकीय रेल्वे पोलिसांनी (जीआरपी) या घटनेची माहिती दिली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर जीआरपीने या प्रकरणाचा तपास सुरू केला. व्हिडिओमध्ये डझनभर लोक ट्रेनमध्ये वृद्ध व्यक्तीला मारहाण आणि शिवीगाळ करताना दिसत आहेत. 

हा इसम जळगावचा रहिवासी असून कल्याणला आपल्या मुलीच्या घरी आत असताना सह्प्रवाशांना तो गोमांस घेऊन जाण्याचा संशय आला आणि इतर प्रवाशांनी त्याच्यावर हल्ला केला.या घटनेचा व्हिडीओ व्हायरल हल्यावर व्हिडिओची दखल घेत पोलिसांनी पीडीत व्यक्तीची ओळख पटवली आहे. तसेच हल्ला करणाऱ्यांपैकी काही जणांची ओळख पटली आहे. या प्रकरणाची चौकशी सुरु असल्याचे जीआरपी ने सांगितले. 
Edited by - Priya Dixit