मनसुख हिरेन हत्या प्रकरणी NIAने क्राईम ब्रँचमधील अधिकाऱ्याला दिला समन्स

sachin waze
Last Modified मंगळवार, 30 मार्च 2021 (20:45 IST)
मनसुख हिरेन हत्या प्रकरणी NIAने क्राईम ब्रँचमधील अधिकाऱ्याला समन्स बजावल्याचे समोर आले आहे. हिरेन हत्या प्रकरणामध्ये क्राईम ब्रँचमध्ये काम केलेल्या या अधिकाऱ्याची संशयास्पद भूमिका आढळली आहे. या अधिकाऱ्याची नुकतीच बदली करण्यात आली होती. सचिन वाझेने या अधिकाऱ्याकडे फोन दिला होता आणि त्याला बिझी असल्याचे कारण द्यायला वाझेने सांगितले होते.
माहितीनुसार, ४ मार्च रोजी मनसुख हिरेन यांची हत्या करण्यात आली होती. तेव्हा हा अधिकारी पोलीस आयुक्तालयातील सीआययूच्या कार्यालयात होता. सचिन वाझेने आपला फोन त्याच्याकडे दिला होता आणि कोणाचा फोन आलाच तर तो रिसिव्ह करून वाझे ऑफिसमध्ये असून बिजी असल्याचे सांगायला सांगितले होते. याआधीही या अधिकाऱ्याची एटीएस (ATS)कडून चौकशी झाल्याची सूत्रांची माहिती आहे. NIAला संशय आहे की, वाझे ठाण्याला गेला होता तेव्हा हा फोन या अधिकाऱ्याकडे मुद्दाम देण्यात आला होता.
दरम्यान आज NIAचे डीआयजी विधी कुमार NIA कार्यालयात पोहोचले आहेत. प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर भरलेली स्कॉर्पिओ स्फोटके प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणाच्या तपासाची घेणार माहिती आहेत. दरम्यान आज सचिन वाझे प्रकरणात सातवी गाडी जप्त केली आहे. कामोठेमधून आउडलँडर ही गाडी जप्त करण्यात आली आहे. बुधवारी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या याचिकेवर उच्च न्यायालयाने तातडीची सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला आहे.यावर अधिक वाचा :

नरेंद्र मोदींच्या वाराणसीत भीषण परिस्थिती, 'कुठे आहेत आमचे ...

नरेंद्र मोदींच्या वाराणसीत भीषण परिस्थिती, 'कुठे आहेत आमचे खासदार,' लोकांचा सवाल?
वाराणसी… हिंदूंसाठी पवित्र मानल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या शहरांपैकी एक. मात्र, वाराणसी आणि ...

परदेशी मदत कुठे गेली? राहुल गांधी यांचा सवाल

परदेशी मदत कुठे गेली? राहुल गांधी यांचा सवाल
देशातील कोरोना व्हायरस संकटाच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान ...

उल्हासनगर मध्ये धक्कादायक प्रकार, RTPCR स्वॅब स्टिकची ...

उल्हासनगर मध्ये धक्कादायक प्रकार, RTPCR स्वॅब स्टिकची घराघरात पॅकिंग
सुरक्षेची कोणतीही काळजी न घेता कोरोना टेस्टिंगसाठी वापरले जाणारे स्वॅब स्टिक घरात जमिनीवर ...

ब्लड ऑक्सीजन मॉनिटरसह स्मार्ट बँड्स, किंमत ऑक्सीमीटरपेक्षा ...

ब्लड ऑक्सीजन मॉनिटरसह स्मार्ट बँड्स, किंमत ऑक्सीमीटरपेक्षा कमी
देशात कोरोनाने थैमान मांडला आहे. दररोज लाखो लोक याने संक्रमित होत आहे. अशात आपल्या ...

IPL 2021: न्यूझीलंडचे चार क्रिकेटर्स परतणार नाही, कारण काय ...

IPL 2021: न्यूझीलंडचे चार क्रिकेटर्स परतणार नाही, कारण काय आहे ते जाणून घ्या
आयपीएल पुढे ढकलण्यात आल्यानंतरही न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनसह चार खेळाडू 10 ...

ICU बेडसाठी जावयाने दिले एक लाख रुपये, पण...

ICU बेडसाठी जावयाने दिले एक लाख रुपये, पण...
पिंपरी चिंचवड मध्ये सुरेखा वाबळे यांना कोव्हिडची लागण झाल्याने पिंपरी चिंचवडमध्ये ...

मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात रोजची रुग्णसंख्या 8 ते 9 ...

मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात रोजची रुग्णसंख्या 8 ते 9 लाखांवर जाण्याची शक्यता - भ्रमर मुखर्जी
मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात देशातल्या कोरोना रुग्णांची दररोजची संख्या 8 ते 9 लाखांवर ...

महाराष्ट्रात गुरुवारी 62,194 नवीन कोव्हिड-19 रुग्ण, 853 ...

महाराष्ट्रात गुरुवारी 62,194 नवीन कोव्हिड-19 रुग्ण, 853 मृत्यूंची नोंद
महाराष्ट्रात गुरुवारी (6 मे) कोरोनाचे 62 हजार 194 नवे रुग्ण आढळले, तर 853 मृत्यूंची नोंद ...

तर तिथे गेल्या वर्षीसारखा लॉकडाउन लावा, मुंबई हायकोर्टाची ...

तर तिथे गेल्या वर्षीसारखा लॉकडाउन लावा, मुंबई हायकोर्टाची सूचना
पुणे तसंच ज्या ठिकाणी रुग्णसंख्या वाढत आहे तिथे लावण्याची सूचना मुंबई हायकोर्टाने ...

पुन्हा एकदा मराठा मोर्चा लॉकडाऊन संपल्यावर १६ मे निघणार

पुन्हा एकदा मराठा मोर्चा लॉकडाऊन संपल्यावर १६ मे निघणार
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण कायदा रद्द केल्यानंतर राज्यात पुन्हा एकदा मराठा मोर्चा ...