शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 2 फेब्रुवारी 2023 (22:21 IST)

आता आपल्यालाही अर्थसंकल्पासाठी कल्पना, सूचना सांगता येणार, करा हे

devendra fadnavis
राज्याच्या  अर्थसंकल्पात जनतेच्या मागण्याचं प्रतिबिंब दिसावं म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी संकल्पना मांडली आहे. यासाठी त्यांनी नागरिकांना महत्वाचं आवाहन केलं आहे. एका वेबसाईटची लिंक शेअर करत त्यांनी यावर सूचना पाठवण्याचं आवाहन केलं आहे. 
 
फडणवीसांच्या पोस्टमध्ये म्हटलं की, प्रिय महाराष्ट्र, आपल्या राज्याचा अर्थसंकल्प मुंबईत होणाऱ्या आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात सादर केला जाईल. याची तयारी सुरू झाली आहे. पण अर्थसंकल्प तुमचा आहे आणि तुमचा सहभाग आवश्यक आहे. तर महाराष्ट्र राज्य अर्थसंकल्प 2023 साठी तुमच्या कल्पना/सूचना जरूर कळवा. http://bit.ly/MahaBudget23 ही लिंक ओपन करुन त्यात आपल्या सूचना मांडण्याचं आवाहन फडणवीसांनी केलं आहे.
 
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच राज्याचे अर्थमंत्री म्हणून 2023चा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. सातत्याने जनतेत राहणे आणि जनतेच्या मतांना सर्वोच्च प्राधान्य देणे, हे त्यांचे कायमच वैशिष्ट्य राहिले आहे. याच भूमिकेतून या अर्थसंकल्पासाठी त्यांनी महाराष्ट्रातील जनतेकडून काही अभिनव संकल्पना आमंत्रित केल्या आहेत. महाराष्ट्रातील जनतेला अर्थसंकल्प कसा हवा, हे देवेंद्र फडणवीस जाणून घेणार आहेत. त्यामुळे आता क्षणाचाही विलंब न करता, या अर्थसंकल्पात तुम्हाला काय हवे आणि तुमच्या नाविन्यपूर्ण संकल्पना कोणत्या, यावर तत्काळ लिहा, असंही फडणवीसांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor