1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. On the occasion of Raksha Bandhan, dear sisters are likely to get a gift

रक्षाबंधनच्या मुहूर्तावर लाडक्या बहिणींना महाराष्ट्र सरकारकडून विशेष भेट मिळण्याची शक्यता

महाराष्ट्रातील पात्र महिलांना रक्षाबंधनच्या निमित्ताने एक विशेष भेट मिळण्याची शक्यता आहे.  
 
महाराष्ट्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी "मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने"च्या महिला लाभार्थ्यांसाठी आगामी रक्षाबंधन सण खूप खास ठरू शकतो. राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे की, राज्य सरकार रक्षाबंधनच्या शुभ मुहूर्तावर राज्यातील पात्र महिलांना एक विशेष आर्थिक भेट किंवा बोनस हप्ता देऊ शकते. राज्य सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नसली तरी, मागील अनुभव आणि शेजारील मध्य प्रदेशातील पद्धत पाहता, 'लाडकी बहिण योजने'कडून अपेक्षा वाढल्या आहे.
महाराष्ट्रातील 'लाडकी बहिण योजने'ने यापूर्वी रक्षाबंधनाच्या निमित्ताने महिलांना आर्थिक लाभ आणि मानधन देऊन फायदा मिळवून दिला आहे. यामुळेच राज्यातील लाखो लाभार्थी महिला या रक्षाबंधनाला सरकारकडून एका मोठ्या घोषणेची किंवा विशेष आर्थिक पॅकेजची आतुरतेने वाट पाहत आहे.
 
"माझी लाडकी बहीण योजने"अंतर्गत, पात्र महिलांना दरमहा ₹१,५०० ची आर्थिक मदत थेट त्यांच्या बँक खात्यात दिली जाते. जर सरकारने रक्षाबंधनानिमित्त अतिरिक्त भेट देण्याचा निर्णय घेतला, तर सणासुदीच्या काळात राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बळ आणि मध्यमवर्गीय महिलांना मोठा आर्थिक दिलासा मिळेल.  
Edited By- Dhanashri Naik
पुढील लेख
स्वातंत्र्यदिनानिमित्त मुलांसाठी बनवा Healthy Tricolor Chaat Recipes