1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. Possibility of Kharat being killed in an encounter, Praniti Shinde's sensational claim

'खरातचा एन्काऊंटर होण्याची शक्यता', प्रणिती शिंदे यांचा खळबळजनक दावा

अशोक खरात प्रकरणात दिवसेंदिवस नवे खुलासे होत असून नाशिकच्या या तथाकथित भोंदूबाबाच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. भविष्य सांगण्याच्या बहाण्याने महिलांचे शोषण, आक्षेपार्ह व्हिडिओ तयार करून ब्लॅकमेलिंग आणि कोट्यवधींची फसवणूक केल्याचे गंभीर आरोप त्याच्यावर आहेत. या प्रकरणात खरातचे अनेक राजकीय नेत्यांसोबतचे फोटो समोर आल्यानंतर राज्यात मोठी खळबळ उडाली आहे.
 
दरम्यान, अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) खरातविरोधात मोठी कारवाई करत नाशिक, पुणे आणि शिर्डी येथील त्याच्या २५ ठिकाणी छापे टाकले. या कारवाईत आलिशान वाहनांसह ४२ लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली असून ईडी व आयकर विभागाच्या हाती अनेक महत्त्वाचे दस्तऐवज लागल्याची माहिती आहे.
 
या पार्श्वभूमीवर काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी धक्कादायक दावा केला आहे. अशोक खरातचे संबंध सत्ताधारी वर्तुळातील प्रभावशाली व्यक्तींपर्यंत पोहोचत असल्याने त्याचा एन्काऊंटर होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
 
प्रणिती शिंदे म्हणाल्या की, हे प्रकरण केवळ एका भोंदूबाबापुरते मर्यादित नसून त्याचे धागेदोरे सत्तेत असलेल्या काही बड्या नेत्यांपर्यंत जाऊ शकतात. चौकशीदरम्यान खरातने या नेत्यांची नावे उघड केल्यास ती माहिती बाहेर येऊ नये म्हणून त्याचा जीव घेण्याचाही प्रयत्न होऊ शकतो, असा गंभीर आरोप त्यांनी केला. पुरावे नष्ट करण्यासाठी त्याला संपवले जाऊ शकते, अशीही शक्यता त्यांनी व्यक्त केली.
 
तसेच महिला आरक्षणाबाबत बोलणारेच जर महिलांविरोधी मानसिकता बाळगत असतील, तर अशा लोकांकडून आरक्षणाची प्रभावी अंमलबजावणी कशी होणार, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

अशोक खरात प्रकरण उघडकीस आल्यानंतर त्याचे अनेक राजकीय नेत्यांशी संबंध असल्याचे समोर आले आहे. रुपाली चाकणकर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनील तटकरे, चंद्रकांत पाटील, दीपक केसरकर आणि संजय शिरसाट यांच्यासह अनेक प्रभावशाली नेत्यांच्या संपर्कात तो असल्याची माहिती पुढे आली आहे.
About Writer
वेबदुनिया न्यूज टीम
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा
पुढील लेख
पंजाबमध्ये भीषण बस अपघात; 6 भाविकांचा मृत्यू तर 21 जण गंभीर जखमी