गुरूवार, 23 एप्रिल 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 2 एप्रिल 2026 (13:24 IST)

एक माहिती, एक लाख रुपये! कन्याभ्रूणहत्या रोखण्यासाठी वाशिम प्रशासनाचा मोठा निर्णय

Washim District Administration Initiative
वाशिम: जिल्ह्यातील लिंग गुणोत्तर (Sex Ratio) सुधारण्यासाठी आणि कन्याभ्रूणहत्येसारख्या गंभीर प्रकारांना आळा घालण्यासाठी वाशिम जिल्हा प्रशासनाने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. बेकायदेशीर लिंग निवड चाचणी करणाऱ्या केंद्रांची किंवा डॉक्टरांची खात्रीशीर माहिती देणाऱ्या व्यक्तीला आता १ लाख रुपयांचे रोख बक्षीस देण्यात येणार आहे.
 
काय आहे ही योजना?
वाशिमचे जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल कावरखे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात येत आहे. पीसीपीएनडीटी (PCPNDT) आणि एमटीपी (MTP) कायद्यांतर्गत बेकायदेशीर कृत्यांवर नियंत्रण मिळवणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे.
 
योजनेची ठळक वैशिष्ट्ये:
माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव आणि ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल. माहितीच्या आधारे गुन्हा सिद्ध झाल्यास माहितीदाराला १ लाख रुपये दिले जातील.
 
समाजात मुलगा-मुलगी भेद नष्ट करण्यासाठी नागरिकांनी, आरोग्य कर्मचाऱ्यांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
 
जिल्हा प्रशासनाच्या या पावलामुळे अवैध गर्भलिंग चाचणी करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून, यामुळे जिल्ह्याच्या लिंग गुणोत्तरात सकारात्मक सुधारणा होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.