शरद पवारांसह राज्यातील सात खासदारांची राज्यसभेतून निवृत्ती
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार, रामदास आठवले, छत्रपती संभाजीनगर चे भाजपचे नेते आणि माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्यासह एकूण सात खासदार राज्यसभातून निवृत्ती झाली आहे. देशभरात भाजपच्या तब्बल 30 राज्यसभा खासदारांचा कार्यकाळ पूर्ण होत आहे.
2026 या वर्षात देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहे. राज्यसभेतील एकूण 71 खासदारांचा कार्यकाळ या वर्षी समाप्त होणार आहे. मार्च महिन्यात 1 एप्रिलमध्ये 37 जून मध्ये 22 तर नोव्हेंबर मध्ये 11 खासदार निवृत्त होणार आहे.
महाराष्ट्र राज्यातून राज्यसभेतील 7 खासदारांचा कार्यकाळ 2 एप्रिल मध्ये पूर्ण होणार असून या मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सपाचे शरदपवार, भाजपचे डॉ. भागवत कराड, रिपब्लिकन पक्षाचे रामदास आठवले, डॉ. फौजिया खान, धैर्यशील मोहन पाटील, काँग्रेस पक्षाच्या रजनी पाटील, शिवसेना युबीटीच्या प्रियांका चतुर्वेदी यांचा समावेश आहे.
राज्यसभेतील एकूण 245 जागांपैकी एप्रिल, जून आणि नोव्हेंबर 2026 या कालखंडात 73 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे.काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा राज्यसभेतील कार्यकाळ 25 जून 2026 रोजी संपणार आहे.
Edited By - Priya Dixit