मुंबईत मुसळधार पावसामुळे,स्पाईसजेट आणि इंडिगोने प्रवाशांसाठी प्रवास सूचना जारी केली
मुंबईत सततच्या पावसामुळे विमानसेवा विस्कळीत होण्याची शक्यता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर, खासगी विमान कंपनी स्पाईसजेटने प्रवाशांसाठी प्रवास सूचना जारी केली आहे.
एअरलाइनने 'X' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केले आहे की, मुंबई विमानतळावर मुसळधार पावसामुळे आगमन आणि निर्गमनावर, तसेच त्यांच्याशी संबंधित इतर विमानांवर परिणाम होऊ शकतो. हवामानाच्या परिस्थितीमुळे विमानांना विलंब होण्याची किंवा त्यांचे वेळापत्रक बदलण्याची शक्यता आहे.
स्पाइसजेटने प्रवाशांना विमानतळावर जाण्यापूर्वी फ्लाइटची नवीनतम स्थिती तपासण्याचे आवाहन केले आहे. विमानतळावर कोणतीही अडचण टाळण्यासाठी प्रवाशांनी संभाव्य बदलांविषयी जागरूक राहावे, असा सल्ला एअरलाइनने दिला आहे.
स्पाइसजेटचा प्रवास सल्ला अशा वेळी आला आहे, जेव्हा ही विमान कंपनी आर्थिक अडचणींचा सामना करत आहे. वृत्तानुसार, विमान पुरवठादारांनी विमान कंपनीच्या चार बोईंग ७३७-८ मॅक्स विमानांची नोंदणी रद्द करण्यासाठी नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाकडे (DGCA) संपर्क साधला आहे.
ही विमाने बऱ्याच काळापासून वापरात नाहीत. स्पाईसजेटचे म्हणणे आहे की, या विमानांची नोंदणी रद्द केल्याने कंपनीवरील भाड्याचा भार कमी होईल. तथापि, मुंबईतील खराब हवामानामुळे उड्डाणांवर होणाऱ्या संभाव्य परिणामामुळे, एअरलाइनने प्रवाशांना प्रवासाचे नियोजन करताना अधिक सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे.
Edited By - Priya Dixit
