मंगळवार, 10 फेब्रुवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 3 फेब्रुवारी 2026 (15:41 IST)

बीड आणि पुण्याच्या पालकमंत्रीपदी सुनेत्रा पवार, शासनाकडून परिपत्रक जारी

who is sunetra pawar wife of ajit pawar
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनांनंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर आता त्यांच्या खांदी बीड आणि पुण्याच्या पालकत्वाची जबाबदारी आली आहे. सुनेत्रा पवार यांना पुण्याचे आणि बीडचे पालकमंत्री करण्यात आले आहे. प्रशासन विभागाने या संदर्भात परिपत्रक काढले आहे. 
अजित दादा यांच्या निधनांनंतर चौथ्या दिवशी राजभवनात सुनेत्रा पवारांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. शपथविधी घाईघाईने घेण्याचा आरोप काहींनी केला.मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी या बाबतचे स्पष्टीकरण दिले आहे. पवार कुटुंबाकडून तिसऱ्याच दिवशी दशक्रिया विधी करूनच शपथविधी केली.
सुनेत्रा पवार यांच्या कडे अर्थखाते वगळता अजित पवारांची सर्व खाते देण्यात आली आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीयअध्यक्षपदाची जबाबदारी देखील भविष्यात त्यांच्याकडे देण्याची शक्यता असल्याचे संकेत प्रफुल्ल पटेल यांनी दिले पत्रकार परिषदात दिले आहे.
 
अजित पवारांनंतर पुण्याचे पालकमंत्रीचे पद कोणाला दिले जाणार या चर्चांवर आता पूर्ण विराम दिला आहे. शासनाने जारी केलेल्या परिपत्रकामध्ये बीड आणि पुण्याच्या पालकमंत्री म्हणून सुनेत्रा पवारांना जबाबदारी दिल्याचे सांगितले आहे.
सुनेत्रा पवार येत्या 9 फेब्रुवारी रोजी मंत्रालयात कार्यभार स्वीकारण्याची माहिती समोर आली आहे. बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्या प्रकरणातच्या कारणास्तव तत्कालीन मंत्री धनंजयमुंडे यांनी राजीनामा दिल्याने आता बीडच्या पालकमंत्री पदाची धुरा सुनेत्रा पवार या सांभाळणार आहे. 
Edited By - Priya Dixit