सोमवार, 26 सप्टेंबर 2022
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified मंगळवार, 9 ऑगस्ट 2022 (08:46 IST)

तृणनाशक प्राशन करून शिक्षकाची आत्महत्या

सावंतवाडी :तृणनाशक पिऊन शिक्षकाने आत्महत्या केल्याचा प्रकार सावंतवाडी शहरात घडला. शहरातील न्यू खासकिलवाडा येथील काॅसमाॅस पॅराडाईज येथे वास्तव्यास असणारे दशरथ बापू सावंत (वय ५२) यांनी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास आत्महत्या केली. तृणनाशक पिऊन ते आपल्या फ्लॅटमधून इमारतीच्या टेरेसवर गेले होते. त्या ठिकाणी ते अत्यवस्थ अवस्थेत आढळून आले. शेजाऱ्यांना सदरची घटना समजताच त्यांनी दशरथ यांना रूग्णालयात उपचाराकरीता दाखल केले. परंतु रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. याबाबत सावंतवाडी पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली.