राज्य निवडणूक आयोगाने केंद्रनिहाय मतदार यादीची अंतिम मुदत 3 जानेवारी पर्यंत वाढवली
महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने (एसईसी) शुक्रवारी सर्व महापालिका आयुक्तांना 3 जानेवारीपर्यंत मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या, ज्यामध्ये डुप्लिकेट मतदारांची नावे समाविष्ट आहेत, प्रकाशित करण्याचे निर्देश दिले आणि त्यासाठीची अंतिम मुदत पुन्हा एकदा वाढवली आहे.
निवडणूक आयोगाने मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी 27 डिसेंबर ही अंतिम तारीख जाहीर केली आहे. मुंबईसह राज्यातील 29महानगरपालिकांसाठी 15 जानेवारी रोजी निवडणुका होणार आहेत आणि दुसऱ्या दिवशी मतमोजणी होईल. यापूर्वी मतदार यादी प्रसिद्ध करण्याची अंतिम तारीख 22 डिसेंबर होती, ती 27 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली होती.
राज्य निवडणूक आयोगाने मतदान केंद्र निहाय यादी जाहीर करण्याबाबत सुधारित कार्यक्रम शुक्रवारी जाहीर केला. महापालिका निहाय संपूर्ण मतदार यादी जसजशी पूर्ण होईल तशीतशी प्रसिद्ध करण्याचे आदेश देण्यात आले आहे. या यादीवरून दहापेक्षा मतदान केंद्र कोणत्या ठिकाणी आहे मतदार संख्या किती आहे. या वरून किती मतदान केंद्र संवेदनशील आहे. याची निश्चिती करण्यात येईल.
पालिका कार्यक्षेत्रात विधानसभेसाठी सुमारे 10,111 मतदान केंद्र उपलब्ध करण्यात आली असून केंद्राची संख्या जास्त कमी होण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी सांगितली आहे. मतदान केंद्रावर वीजपुरवठा, पाण्याची व्यवस्था, रॅम्प, प्रसाधन गृहे अशी व्यवस्था देण्यासाठी प्रक्रिया सुरु झाली आहे. अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.
Edited By - Priya Dixit