शुक्रवार, 17 एप्रिल 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 12 मार्च 2026 (09:39 IST)

महाराष्ट्रात काही ठिकाणी एलपीजी सिलिंडरचा तुटवडा; नागरिकांची थेट गोदामांवर गर्दी

cylinder
इराण-इस्रायल संघर्षाचा परिणाम महाराष्ट्रात दिसू लागला राज्यात काही ठिकाणी व्यावसायिक गॅसचा (LPG/CNG) तुटवडा निर्माण झाला  मुंबई-पुण्यातील काही हॉटेल्सवर याचा परिणाम झाला आहे. तसेच राज्यात काही ठिकाणी एलपीजी सिलिंडरचा तुटवडा जाणवत असून अनेक शहरांमध्ये वितरण केंद्रांबाहेर नागरिकांच्या लांब रांगा लागल्या आहे. हॉटेल-रेस्टॉरंट व्यवसायालाही याचा मोठा फटका बसत आहे. सोलापूरसह अनेक ठिकाणी गॅस मिळवण्यासाठी नागरिकांच्या लांब रांगा लागल्या आहे.  
 
इराण-इस्रायलमधील वाढत्या तणावाचे सावट आता महाराष्ट्रातील स्वयंपाकघरांपर्यंत आणि हॉटेल व्यवसायापर्यंत पोहोचले आहे.  मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये व्यावसायिक सिलिंडरचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. हॉटेल व्यावसायिकांना व्यावसायिक सिलिंडर मिळण्यासाठी आता ४८ ते ७२ तास प्रतीक्षा करावी लागत आहे.  तसेच व्यावसायिक गॅसच्या दरात मोठी वाढ झाल्यामुळे हॉटेलमधील खाद्यपदार्थांच्या किमती १०% ते १५% वाढण्याची शक्यता आहे. मुंबईतील टॅक्सी, रिक्षा आणि पुण्याच्या पीएमपीएल (PMPML) बससेवेलाही सीएनजीच्या मर्यादित पुरवठ्याचा फटका बसत आहे, ज्यामुळे पंपांवर लांबच लांब रांगा दिसत आहे.
 
मुंबई, पुणे, नागपूर आणि नाशिक यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये घरगुती एलपीजी (LPG) सिलिंडरसाठी नागरिकांना ३ ते ५ दिवस प्रतीक्षा करावी लागत आहे. अनेक ठिकाणी बुकिंग करूनही वेळेवर डिलिव्हरी मिळत नसल्याने नागरिक थेट गोदामांवर गर्दी करत आहे.
 
व्यावसायिक सिलिंडरचा पुरवठा विस्कळीत झाल्याने हॉटेल चालकांना काळ्या बाजारातून चढ्या दराने गॅस खरेदी करावा लागत आहे. यामुळे बाहेरचे जेवण महागण्याची दाट शक्यता आहे.
राज्य आणि केंद्र सरकार या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. गॅस कंपन्यांनी साठवणूक वाढवण्याच्या सूचना दिल्या आहे. तसेच गॅसचा तुटवडा असल्याने अफवांवर विश्वास ठेवू नका आणि सिलिंडरची अनावश्यक साठवणूक करणे टाळा.
अनेक जिल्ह्यांत जिल्हाधिकाऱ्यांनी गॅस कंपन्यांच्या प्रतिनिधींची बैठक बोलावून पुरवठा सुरळीत करण्याचे आदेश दिले आहे. 
Edited By- Dhanashri Naik