अजित पवार विमान अपघाताची सीआयडी चौकशीचा राज्य सरकारचा निर्णय
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचा बारामतीत विमान अपघात दुर्देवी निधन झाले. या प्रकरणात राज्य सरकारने महत्त्वाचे निर्णय घेतले आहे. राज्य सरकार ने अपघाताची सीआयडी चौकशी करण्याचे निर्णय घेतले आहे. या प्रकरणातील गांभीर्य लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच अपघातस्थळी कोणालाही न जाऊ देण्याच्या सूचना बारामती पोलिसांना देण्यात आल्या आहेत.
बुधवारी 28 जानेवारी रोजी मुंबईहून बारामतीत जिल्हा परिषद निवडणुकांसाठी प्रचारसभा घेण्यासाठी जात असताना उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमानाचा लेन्डिंग दरम्यान अपघात झाला आणि या अपघातात अजित पवारांसह एकूण सहा जण मृत्युमुखी झाले.
प्राथमिक माहितीनुसार, खराब हवामान आणि लो व्हिजिबिलिटीमुळे हा अपघात झाला असावा अशी शक्यता आहे. हा अपघात विमानाच्या तांत्रिक बिघाडामुळे किंवा घातपात आहे याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली.
या अपघाताचा तपास करण्याची जबाबदारी आता राज्य सरकारने सीआयडी कडे सोपवली आहे. स्थानिक पोलिसांनी जरी अकस्मात मृत्यू (ADR) म्हणून प्राथमिक नोंद केली असली, तरी सीआयडी आता या घटनेचा तांत्रिक आणि संभाव्य गुन्हेगारी अशा दोन्ही कोनांतून सूक्ष्म तपास करणार आहे.
पुराव्यांचे संरक्षण करण्यासाठी संपूर्ण अपघातस्थळाला सध्या छावणीचे स्वरूप आले असून, तिथे बाहेरील व्यक्तींना पूर्णपणे प्रवेश बंदी करण्यात आली आहे.
राज्य सरकारने या प्रकरणाचा तपास लवकरात लवकर पूर्ण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्णयामुळे आता तपासाला वेग येणार आहे.
Edited By - Priya Dixit