संबंधित माहिती
- LIVE: दिल्लीतील महाराष्ट्र सदनासाठी तीन नवीन वाहने खरेदी केली जाणार
- बच्चू कडू यांचा इशारा: दिव्यांग आणि दृष्टिहीन बांधवांच्या थकीत मानधनाचा १९ मे पर्यंत प्रश्न न सुटल्यास मंत्रालयात आंदोलन करणार
- महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, महिला व बाल विकास विभागात डिजिटल बदली प्रणाली लागू
- फेक न्यूज पसरवणाऱ्यांना आता चाप! महाराष्ट्र सरकार आणतंय नवा कठोर कायदा
- राज्य शासनाने सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू केली; सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर मिळणार पगाराच्या 50 % पेन्शन
दिल्लीतील महाराष्ट्र सदनाला नवीन वाहने मिळणार; मुख्यमंत्र्यांसाठी अत्याधुनिक बुलेटप्रूफ कार खरेदी केली जाणार
दिल्लीतील महाराष्ट्र सदनासाठी तीन नवीन वाहने खरेदी केली जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेसाठी एका अत्याधुनिक बुलेटप्रूफ वाहनाला मंजुरी देण्यात आली आहे.
नवी दिल्लीतील महाराष्ट्र सरकारचे अधिकृत मुख्यालय असलेल्या महाराष्ट्र सदनातील शासकीय परिवहन सेवेत लवकरच मोठा बदल होणार आहे. दिल्लीतील निवासी आयुक्त आणि सचिव कार्यालयाद्वारे वापरली जाणारी जुनी वाहने बदलून त्याजागी नवीन वाहने आणण्याचा औपचारिक आदेश राज्य सरकारने जारी केला आहे. या निर्णयाचा एक भाग म्हणून, मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली मुक्कामादरम्यान त्यांच्या ताफ्यासोबत असणारे बुलेटप्रूफ वाहनही अद्ययावत केले जात आहे.
शासकीय आदेशानुसार, सध्या वापरात असलेल्या वाहनांची कार्यकाळाची मुदत संपली आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जुन्या बुलेटप्रूफ वाहनाची देखभाल करणे आव्हानात्मक बनले होते, त्यामुळे नवीन वाहने खरेदी करणे आवश्यक झाले. सरकारने स्पष्ट केले आहे की, नवीन वाहनांची खरेदी राज्याच्या विहित कार्यपद्धती, वित्तीय अधिकार नियमावली आणि शासकीय खरेदी धोरणाच्या कठोर नियमांनुसार केली जाईल.
मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांसारख्या उच्च घटनात्मक पदांवर असलेल्या व्यक्तींच्या सुरक्षेसाठी विशेष नियमावलीचे पालन केले जाते. दिल्लीसारख्या संवेदनशील भागांमध्ये मुख्यमंत्र्यांच्या प्रवासासाठी बुलेटप्रूफ वाहन अनिवार्य आहे. सरकारने हे देखील स्पष्ट केले आहे की, वाहन बुलेटप्रूफ बनवण्यासाठी येणारा अतिरिक्त खर्च संबंधित शासकीय निधीतून दिला जाईल. निविदा प्रक्रिया लवकरच सुरू होईल, ज्यामध्ये सुरक्षा मानकांची पूर्तता करणाऱ्या निवडक कंपन्यांना सहभागी होता येईल.
Edited by-Dhanashri Naik
