1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 25 फेब्रुवारी 2026 (15:29 IST)

अवकाळी मुळे शेतकरी पुन्हा संकटात

Maharashtra News
अवकाळी मुळे शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे, फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात राज्यातील विविध भागांत झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीने रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान केले आहे, ज्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक संकटात सापडला आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार मराठवाडा म्हणजे धाराशिव, लातूर, बीड, नांदेड आणि परभणी जिल्ह्यात जोरदार पाऊस आणि गारपीट झाली आहे. लातूरच्या उदगीर तालुक्यात अंगावर वीज पडून एका ६० वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
 
तसेच विदर्भमध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया आणि यवतमाळ जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पाऊस झाला असून काही ठिकाणी पिके जमीनदोस्त झाली आहे.
 
तर उत्तर महाराष्ट्रमध्ये नाशिक, जळगाव आणि धुळे भागात द्राक्ष, केळी आणि पपईच्या बागांना मोठा फटका बसला आहे.
 
हा काळ रब्बी पिकांच्या काढणीचा असल्याने नुकसान अधिक तीव्र असून गहू, हरभरा आणि ज्वारी ही पिके कापणीला आलेली असताना पावसामुळे भिजली असून, दाणे काळे पडण्याची किंवा सडण्याची भीती निर्माण झाली आहे. तर आंबा (मोहोर गळणे), द्राक्ष, संत्री आणि टरबूज पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तसेच पालेभाज्या आणि टोमॅटोचे पीकही या पावसामुळे खराब झाले आहे.
महसूल मंत्री आणि स्थानिक पालकमंत्र्यांनी प्रशासनाला तातडीने शेतीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहे. विधानसभेत चर्चा सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही विरोधकांनी हा मुद्दा लावून धरला असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी मदत जाहीर करण्याची मागणी केली जात आहे.
तसेच हवामान विभागाने  पुढील २४ ते ४८ तासांत दक्षिण महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांत पुन्हा 'यलो अलर्ट' दिला आहे. त्यामुळे काढणी केलेले धान्य सुरक्षित ठिकाणी झाकून ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Edited By- Dhanashri Naik