पत्नी करोनाने गेली, पतीनेही गळफास घेत स्वत:चं आयुष्यच संपविलं!

Last Modified बुधवार, 31 मार्च 2021 (14:25 IST)
करोनाने सात-आठ महिन्यांपूर्वी रोजगार हिरावला. त्यातून कसंबसं सावरत कुठं तोच या करोनाने पत्नी गेली. मग खचून जाऊन त्यानं गळफास घेत स्वत:चं आयुष्यच संपविलं. करोनामुळं अनेकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली. तसेच, जवळच्या व्यक्तीही दुरावल्या गेल्यानं समाजात आत्महत्यांच्या घटना वाढत आहेत. प्रत्येक घटनेतली पात्रे, दु:ख, वेदना वेगळ्या असल्या तरी आर्थिक विवंचनेची किनार सारखीच आहे.

श्रमिकनगरमध्ये राहणाऱ्या संगीता पवार (वय ४५) यांना सोमवारी रात्री श्वास घेण्यास त्रास झाला. वेळेवर रुग्णालयात बेड उपलब्ध न झाल्यानं त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, पहाटे चारच्या सुमारास त्यांचे निधन झाले. त्यांचा मुलगा बाळा याने वडील रवींद्र पवार (वय ५३) यांना फोन करून आईच्या मृत्यूची माहिती दिली. पुन्हा फोन केले असता, रवींद्र यांनी प्रतिसाद दिला नाही म्हणून त्याने शेजाऱ्यांना कळवलं. त्यांनीही आवाज देऊन बघितला. शेवटी खिडकी उघडून आत बघितले असता, रवींद्र यांनी फॅनला गळफास घेतल्याचं दिसून आलं. पत्नीचीच साडी घेऊन त्यांनी स्वत:ला संपवलं. पवार सुरक्षारक्षक म्हणून काम करीत होते. मात्र, काही महिन्यांपासून त्यांच्या हाताला काम नव्हते. ते मूळचे येसगाव (ता. मालेगाव) येथील आहेत. करोनानं त्यांचा संसारच उद्धवस्त केला. आता मुलगा बाळा (वय२२) व मुलगी काजल (वय २४) दोघेही पोरके आले आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच राधाकृष्णनगर भागात गांगुर्डे नामक स्कूल व्हॅन चालकाने आर्थिक चणचणीमुळे गळफास घेतला होता.


यावर अधिक वाचा :

"जपा वनस्पती, करा त्याचा उपयोग, निरामय जीवनासाठी"

विविध वनस्पतीचा मौल्यवान खजीना, अमूल्य आहे, जपा वनस्पती ना,

धनकवडीत राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात महिलेचा मृतदेह ...

धनकवडीत राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात महिलेचा मृतदेह सापडला
पुण्यातील धनकवडी परिसरातील एका घरामध्ये रक्ताच्या थारोळ्यात एका महिलेचा मृतदेह सापडला. आज ...

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सतर्कतेमुळे ‘ती’ बचावली

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सतर्कतेमुळे ‘ती’ बचावली
संगमनेर तालुक्यातील कौठे कमळेश्वर गावात होणारा अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखण्यात ...

ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांसाठी उद्योगांना विशेष प्रोत्साहन; ...

ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांसाठी उद्योगांना विशेष प्रोत्साहन; शासन निर्णय जारी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याची ऑक्सिजनची गरज पूर्ण करण्यासाठी शासनाने ‘मिशन ऑक्सिजन ...

‘लसीच्या तुटवड्याला केंद्र सरकारच जबाबदार’; सीरम ...

‘लसीच्या तुटवड्याला केंद्र सरकारच जबाबदार’; सीरम इन्स्टिट्यूटचा धक्कादायक आरोप
गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशभरात थैमान घातलं आहे. कोरोनाच्या ...

SMA : चिमुकल्या वेदिका शिंदेला 16 कोटींचं इंजेक्शन मिळालं

SMA : चिमुकल्या वेदिका शिंदेला 16 कोटींचं इंजेक्शन मिळालं
अमृता दुर्वे स्पायनल मस्क्युलर अॅट्रोफी (SMA Type - 1) आजाराशी लढणाऱ्या वेदिका शिंदे या ...

पावसामुळे कोट्यावधीची साखर पाण्यात भिजली

पावसामुळे कोट्यावधीची साखर पाण्यात भिजली
राज्यात सर्वत्र जोरदार पाऊस सुरु आहे.कुठे तर नदी नाले तुडुंब भरून वाहत आहे.तर कुठे ...

WTC फाइनल 2021:टीम इंडिया ने जाहीर केले खेळाडूंचे नाव

WTC फाइनल 2021:टीम इंडिया ने जाहीर केले खेळाडूंचे नाव
न्यूझीलंडनंतर भारतीय संघाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठीही आपल्या 15 सदस्यीय संघाची ...

चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षात उभी फूट

चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षात उभी फूट
माजी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या निधनानंतर लोक जनशक्ती पार्टीत उभी फूट ...

नारायण राणे: कट्टर शिवसैनिक ते ठाकरेंशी 'शत्रुत्व', कसा आहे ...

नारायण राणे: कट्टर शिवसैनिक ते ठाकरेंशी 'शत्रुत्व', कसा आहे नारायण राणे यांचा राजकीय प्रवास?
शिवसेना, काँग्रेस आणि स्वाभिमानी पक्ष असा प्रवास करून आता भाजपात स्थिरावलेले माजी ...