शनिवार, 11 एप्रिल 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 6 एप्रिल 2026 (13:14 IST)

पुढील २४ तास धोक्याचे ! महाराष्ट्रात काही जिल्ह्यांना वादळीवाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा

पुढील २४ तास धोक्याचे ! महाराष्ट्रात काही जिल्ह्यांना वादळीवाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा
हवामान विभागाने (IMD) दिलेल्या ताज्या माहितीनुसार, महाराष्ट्रात पुढील २४ तासांसाठी काही जिल्ह्यांमध्ये 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे. सध्या राज्यात अवकाळी पावसाचे वातावरण असून काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वारे आणि मुसळधार पावसाची शक्यता आहे.

विदर्भात नागपूर, चंद्रपूर, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. येथे वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता जास्त आहे.

कोकण आणि मुंबई: मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरीमध्ये हवामान मुख्यत्वे कोरडे राहील. पावसाची शक्यता खूपच कमी आहे

अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे गहू, कांदा आणि आंब्याच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
महाराष्ट्रात सध्या उन्हाळ्याच्या हंगामात सुरू असलेल्या अवकाळी पाऊस, गारपीट आणि सोसाट्याच्या वाऱ्यांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी काढणीसाठी तयार असलेली पिके आणि फळबागा नष्ट झाल्या आहे.

हवामान अंदाजानुसार, ६ एप्रिल रोजी नागपूरमध्येही पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्येही पावसाचा अंदाज आहे. हवामान विभागाने असाही अंदाज वर्तवला आहे की, नागपूरसह विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पुढील पाच दिवसांत तापमानात लक्षणीय बदल होणार नाही.

सततच्या अवकाळी पावसामुळे (महाराष्ट्राचे हवामान) द्राक्षे, आंबे, डाळिंब, गहू आणि मका यांसारख्या पिकांवर गंभीर परिणाम झाला आहे. आंबा आणि डाळिंबाच्या फुलांच्या नुकसानीमुळे फळबागायतदारांना मोठे आर्थिक नुकसान होत आहे. हवामानातील वारंवार होणाऱ्या बदलांमुळे शेतीचे नियोजन विस्कळीत झाले असून शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे.
काय काळजी घ्याल?
विजांपासून संरक्षण: विजा चमकत असताना झाडाखाली किंवा पत्र्याच्या शेडखाली उभे राहू नका. शक्य असल्यास घरातच राहा.
शेती: काढणी केलेला शेतीमाल सुरक्षित ठिकाणी हलवा किंवा ताडपत्रीने झाकून ठेवा.
प्रवास: सोसाट्याचा वारा सुटलेला असताना वाहन चालवणे टाळा.
Edited By- Dhanashri Naik