शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मुंबई, अहमदनगर , गुरूवार, 12 जानेवारी 2017 (10:36 IST)

झेडपी निवडणूक 16 फेब्रुवारीला

निकाल 23 फेब्रुवारी, सर्व प्रक्रिया व अर्ज ऑनलाइन भरावे लागणार

संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या मुंबई, पुणे आणि नाशिकसह 10 महापालिकांच्या आणि 25 जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. राज्यातील 10 महापालिकेच्या निवडणुकांसाठी 21 फेब्रुवारीला मतदान होणार असून, 23 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. जिल्हा परिषदांच्या निवडणुकीचे मतदान दोन टप्प्यांत होणार आहे. पहिल्या टप्प्याचं मतदान 16 फेब्रुवारीला होत आहे.  पहिल्या टप्प्यात 15 जिल्हा परिषदा आणि 165 पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. त्यात नगर जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांच्याही याच दिवशी निवडणूक होत आहे.

दुसर्‍या टप्प्याचं मतदान 21 फेब्रुवारीला होणार आहे.या टप्प्यात 10 जिल्हा परिषद आणि 118 पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. या सर्व निवडणुकांची मतमोजणी 23 फेब्रुवारीला होणार आहे. राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी पत्रकार परिषद घेऊन हा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. दरम्यान नगरची निवडणूक पहिल्या टप्प्यात होत असल्याने नगरकरांना या निकालासाठी 6 दिवस वाट पहाणी लागणार आहे. जिल्हा परिषदांच्या निवडणूक विभागातील उमेदवारासाठी व पंचायत समितीच्या निर्वाचक गणातील उमेदवारासाठी प्रत्येकी एक अशी दोन मते ग्रामीण भागातील मतदारांना द्यावी लागतील. नगर जिल्ह्यात 73 गट तर 146 गणांसाठी ही निवडणूक होणार आहे. सर्वाधिक गट आणि गण संगमनेरात आहेत.

उमेदवारी अर्जासोबत जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे;
परंतु जात वैधता प्रमाणपत्र नसल्यास जात पडताळणी समितीकडे अर्ज केल्याची पावती किंवा अन्य पुरावा देण्याची मुभा देण्यात आली आहे. संबंधित उमेदवारांनी निकाल लागल्यानंतर सहा महिन्यांच्या आत जात वैधता प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे. अन्यथा त्याची निवड भूतलक्षी प्रभावाने रद्द करण्याची संबंधित अधिनियमात तरतूद आहे. दरम्यान, या निवडणुकांचा बिगूल वाजल्याने जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. बैठका, मेळाव्यांचे आयोजनात नेतेमंडळी गुंतली आहेत.

    आचारसंहिता लागू…
 जिल्हा परिषदेच्या निवडणुकांसाठी आजपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. महापालिका किंवा जिल्हा परिषद निवडणूक नाही, अशा जिल्ह्यात विकासाचे बंद करण्यावर बंधन नाही. मात्र, 14 फेब्रुवारीपासून एक्झिट पोल घेण्यास बंदी निवडणूक आयोगाने बंदी घातली आहे.
    उमेदवार बँक खाते बंधनकारक
 निवडणुकीसाठी प्रत्येक उमेदवाराने स्वतंत्र बँक खाते उघडाण्याची अट निवडणूक आयोगाने घातली आहे. त्याचप्रमाणे निवडणूक झाल्यानंतर झालेला खर्च 30 दिवसांत निवडणूक आयोगाकडे जमा करावा.

नामनिर्देशनपत्रांसाठी
    संगणकीय प्रणाली
    या निवडणुकांसाठी संगणकीय प्रणालीद्वारे नामनिर्देशनपत्रे व शपथपत्रे दाखल करण्याची सुविधा आयोगाने उपलब्ध करून दिलेली आहे. त्यासाठी संकेतस्थळ विकसित केले आहे. नामनिर्देशनपत्रे सादर करण्यास सुरूवात

झाल्यानंतनर संगणकीय प्रणालीद्वारे कुठल्याही वेळेस संगणकावर नामनिर्देशनपत्रे व शपथपत्रे भरता येतील. त्याची प्रिंट काढून त्यावर सही करून ते विहीत वेळेतच निवडणूक निर्णय अधिकार्‍याकडे देणे बंधनकारक आहे.उमेदवारांना शपथपत्रे स्टॅम्प पेपरवर सादर करण्याची आवश्यकता नाही. नामनिर्देशनपत्रे संगणक प्रणालीद्वारे भरण्याची सुविधा उपलब्ध असली तरी उमेदवारी मागे घेण्याचे अर्ज संगणकाद्वारे सादर करण्याची आवश्यकता नाही.

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक कार्यक्रम
उमेदवारी दाखल      27 जाने ते 1 फेब्रु.
छाननी     2 फेब्रुवारी
न्यायाधीशांकडे अपील      5 फेब्रुवारी

जिल्हा परिषद निवडणूक दोन टप्प्यांत
निकालाची अंमित तारीख     8 फेब्रुवारी
अपिल नसल्यास माघार      7 फेब्रुवारी
अपिल असल्यास माघार     10 फेब्रुवारी
मतदान       16 फेब्रुवारी
मतमोजणी     23 फेब्रुवारी

पहिला टप्पा – अहमदनगर, हिंगोली, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, जळगाव, बुलढाणा
यवतमाळ ,औरंगाबाद, जालना, परभणी, वर्धा, चंद्रपूर,  गडचिरोली.

दुसरा टप्पा –  नाशिक, पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, अमरावती.

हरकतींसाठी 17 पर्यंत मुदत 
21 जानेवारीला अंतिम यादी
नगर जिल्हा परिषद आणि सर्व पंचायत समितींच्या सार्वत्रिक निवडणूकीकरिता दिनांक 5 जानेवारी, 2017 अस्तित्वात असलेल्या विधानसभा मतदार यादीमधून प्रारुप मतदार यादी तयार केली असून ती यादी आज प्रसिध्द केलेली आहे. हरकती  17 जानेवारी, 2017 पर्यंत संबंधीत तहसील कार्यालयात कार्यालयीन वेळेत लेखी सादर कराव्या लागणार आहे. त्यानंतर 21 जानेवारी रोजी अंतिम यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे.

ट्रू व्होटर प ः उमेदवारांची माहिती पहाता येणार
सर्वसामान्य नागरिक, मतदार, राजकीय पक्ष, उमेदवार, निवडणूक अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी ट्रू व्होटर प विकसित केले आहे. यामुळे मतदारांना मतदार यादीतील आपले नाव आणि मतदान केंद्र शोधता येणे शक्य होईल. उमेदवारांनी शपथपत्राद्वारे भरलेली माहितीदेखील या पच्या माध्यमातून पाहता येईल. या पच्या माध्यमातून उमेदवारांना आपला दैनंदिन खर्च देखील सादर करणे शक्य होईल. तसेच निवडणुकीचा निकालही मिळू शकेल.

प्रभागनिहाय विभाजन करताना झालेल्या चुकाच दुरूस्त होणार
विधानसभेच्या मतदार यादीत नवीन मतदार म्हणून नावाच्या समावेशासाठी 21 ऑक्टोबर 2016 पर्यंत अर्ज केलेल्या व त्यातील भारत निवडणूक आयोगाने मंजूर केलेल्या नावांचाच महानगरपालिका, जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या मतदार यादीत समावेश असेल. विधानसभेच्या मूळ मतदार यादीत कोणत्याही दुरुस्त्या होणार नाहीत. प्रभागनिहाय विभाजन करताना झालेल्या चुकाच फक्त दुरूस्त करता येतील.