शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. महाराष्ट्र माझा
Written By वेबदुनिया|

आदर्श घोटाळा: देशमुखांचे बोट चव्हाणांकडे

PTI
PTI
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासरांव देशमुख यांनी 'आदर्श' घोटाळ्यात आपली कोणतीही भूमिका नसल्याची साक्ष चौकशी आयोगासमोर नोंदवली आहे.

राज्याचे महसूल आणि वित्तमंत्र्यांनी आदर्श गृहप्रकल्पास मंजूरी दिल्यानंतरच आपण संबंधीत फाईलींवर स्वाक्षरी केल्याचे त्यांनी चौकशी आयोगास सांगितल्याचे समजते.

त्यावेळी अशोक चव्हाण हे महसूल तर जयंत पाटील वित्तमंत्री होते. संबंधीत दोन मंत्र्यांनी मंजूरी दिल्यानंतर आपण त्या फाईलला मंजूरी दिल्याचे त्यांनी सांगितले. आदर्श घोटाळ्याप्रकरणी चौकशी आयोगासमोर कालपासून त्यांची साक्ष सुरू आहे.

याअगोदर केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीकुमार शिंदे यांची साक्ष आयोगाने नोंदवली. गृहप्रकल्पासाठी सरकारी जमीन देणे आणि अतिरिक्त एफएसआय देण्यासंबंधीचा निर्णय विलासरांव देशमुखांच्या कार्यकाळात घेण्यात आल्याचे त्यांनी आयोगास सांगितले होते.