शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. महाराष्ट्र माझा
Written By वेबदुनिया|

एकच लक्ष्य राज ठाकरे

मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना पदाधिकार्‍यांसाठी आयोजित केलेल्या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना टार्गेट करीत या निवडणुकीत मनसेच शिवसेनेचे लक्ष्य असल्याचे अधोरेखित केले. आपल्या वीस मिनिटांच्या भाषणात तब्बल अकरा मिनिटे त्यांनी राज यांची खिल्ली उडवली.

रंगशारदा सभागृहात गुरुवारी सायंकाळी आयोजित केलेल्या पदाधिकार्‍यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. राज यांच्याप्रमाणेच त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीलाही आपल्या ठाकरी भाषेत चांगलेच ठणकावले. मराठी माणसांची मुंबई परप्रांतियांच्या हातात देण्याचा डाव काँग्रेसने आखला असून त्यांचा हा डाव कदापी यशस्वी होऊ देऊ नका. मुंबई महापालिकेवर पुन्हा शिवसेनेचाच भगवा फडकवा, अशी शपथही त्यांनी पदाधिकार्‍यांना दिली.