गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: महाड , गुरूवार, 4 ऑगस्ट 2016 (15:47 IST)

एनडीआरएफच्या जवानांची बोट उलटली

सावित्री नदीमध्ये आज पुन्हा शोधकार्याला सुरुवात झाली आहे. मात्र एनडीआरएफच्या जवानांची एक बोट उलटल्याची घटना घडली आहे. सुदैवाने बोटीतील सर्व जवान सुरक्षित आहेत.

एनडीआरएफ, नौदल, हवाईदल, तटरक्षक दल, अग्निशमन दल आणि पोलिसांच्या मदतीने बचावकार्य सुरु आहे. परंतु बुधवारी रात्रभर सुरु असलेला पाऊस आणि अंधारमुळे शोधकार्य थांबवण्यात आलं होतं. त्यानंतर आज सकाळपासूनच एनडीआरएफ, नौदल आणि कोस्टगार्डने सर्च ऑपरेशन सुरु केलं आहे.

मुसळधार पावसामुळे सावित्री नदीला आलेल्या पुरात एक ब्रिटीशकालीन पूल मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास वाहून गेला. महाड आणि पोलादपूर या दोन शहरांना जोडणारा हा ब्रिटीशकालीन पूल होता. यावेळी पुलावरुन जाणाऱ्या दोन एसटी बससह सात ते आठ वाहनंही वाहून गेली. वाहनांमध्ये राजापूर- बोरीवली आणि जयगड-मुंबई या दोन एसटी बसेसचा समावेश आहे.