शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. महाराष्ट्र माझा
Written By wd|
Last Modified: औरंगाबाद , शुक्रवार, 17 ऑक्टोबर 2014 (11:11 IST)

औरंगाबादमध्ये स्फोट, महिला ठार

औरंगाबाद येथील ‍सिडको एमआयडीसी परिसरात अज्ञात वस्तूचा स्फोट झाल्याने भंगार वेचणार्‍या एका  महिलेचा मृत्यू झाला आहे. नंदाबाई भालेराव (वय 30) असे मृत महिलेचा नाव आहे.
 
गुरुवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास सिडको एमआयडीसी पसिसर मोठ्या आवाजाने हादरला. स्पोटाची ‍तीव्रता मोठी  असल्याने ही महिला 10 ते 15 फूल लांब फेकली गेली. कंपनीमधून टाकण्यात आलेल्या वेस्टेज केमिकलचा हा  स्फोट असल्याची प्राथमिक शक्यता वर्तवण्यात आली आहे. स्पोटानंतर घटनास्थळी गुप्तचर संस्था, दहशतवादी प्रतिबंधक पथकांनी तसेच पोलिसांनी पाहाणी केली. 
 
स्पोटाची माहिती मिळताच सिडको एमआयडीसी पोलिस, बॉंम्बशोध व नाशक पथक व अग्निशमन दलाचे पथक घटना स्थळी पोहोचले.