शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: नाशिक , सोमवार, 3 ऑगस्ट 2015 (11:03 IST)

कृत्रिम पाऊस बरसलाच नाही

पाण्याचे ढगच नसल्याने सायगाव येथे  करण्यात आलेला कृत्रिम पावसाचा प्रयोग फसला. नवी मुंबईतील इंटरनॅशनल स्कूल आॅफ प्रोफेशनल स्टडीज संस्थेकडून येथे कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्यात आला. यासाठी रॉकेटसह यंत्रणा सज्ज होती.

मात्र, ढगांची आर्द्रता ७० टक्क्यांपेक्षा कमी असल्याने रॉकेट आकाशात उडालेच नाही. सायगाव येथील आर्द्रता व ढगांचे प्रमाण अधिक असल्याच्या अभ्यासावरून या परिसराची निवड करण्यात आली होती. त्यानुसार सकाळी दहा वाजेपासूनच सायगाव येथे पथकाने यंत्रणा तयार ठेवली होती.  अपेक्षित ढग नसल्याने संध्याकाळी सहा वाजता ‘आॅपरेशन’ थांबविण्यात आले.