बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. महाराष्ट्र माझा
Written By विकास शिरपूरकर|

कोल्हापूर साखर कृतीगटाच्या अध्यक्षपदी घाटगे

राज्यातील सहकारी साखर कारखानदारी अधिक सक्षमतेने कार्यरत व्हावी तसेच साखर कारखानदार आणि राज्य शासन ऊस उत्पादक शेतकरी यांच्या समन्वयाने सर्व त्रुटी दूर व्हावीत याची कृती गटाची चर्चा करण्यासाठी राज्य स्तरीय कृती गटाची (टास्क फोर्स ) स्थापना करण्‌यात आली असून कागलच्या शाहू साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष विक्रमसिंह घाटगे यांची निवड झाली आहे.

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमन १९६० नियम १९६१ व हकारी साखर कारखान्याच्या उपविधीत बदल्यात साखर कारखान्याच्या उपविधीत बदल्यात परिस्थीतीनुसार काही बदल करण्यासाठी आवश्यकता असल्यास त्या अनुसरुन शिफारशी या गटातर्फे कराव्यात अशी शासनाची अपेक्षा आहे. संचालक मंडळावर निवडणुक जाण्यासाठी पात्रता निश्चित करणे संचालक मंडळाच्या अपत्यांची संख्या मर्यादा निश्चित करणे सलग किती वर्षे संचालक म्हणून काम करता येईल हा कालावधी निश्चित करणे, बैठक भत्यात सुधारणा करणे, संचालक मंडळाची किमान व कमाल संख्या निश्चित करणे, ंचालक मंडळाच्या प्रशासकिय व आर्थिक अधिकारांच्या पुर्नविचार व कक्षा वाढविणे सदस्यांत्वाच्या अपात्रता पात्रता नियमावली ठरविणे, ऊस ऊतारा ऊसाचे उत्पादन, कार्यक्षेत्रात उत्पादन वाढविणे नविन सुधारीत जाती कारखाना प्रभारीरित्या व कार्यक्षमतेपणे चालविण्यााठी आवश्यक ते बदल सुचविणे अशा आदर्श उपविधीचा सर्वसामान्य मसुदा तयार करणे. साखर निर्मीती उपपदार्थ निर्मीती मनुष्यबळ वापर आदी अन्य ज्या ज्या बाबी आहेत. त्यांचा उहापोह करुन अहवाल तयार करण्याचे काम या कृती गटाला करावे लागणार आहे.