बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 15 जुलै 2016 (14:20 IST)

डॉक्टर महिलेची पतीने केली गोळी घालून हत्या पिंपरी

डॉक्टर महिलेची अभियंता पतीने गोळी घालून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार वाकड परिसरात घडला. चारित्र्याच्या संशयावरून हत्या करून पळून निघालेल्या आरोपीला तातडीने अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे.

अंजली पाटेदार वाकड मधील मदर केअर या  रुग्णालयात बसल्या असताना चारित्र्याच्या संशयावरुन अभियंता मनोजने अंजली यांच्याशी वाद घालायला सुरुवात केली. या वादाचं रूपांतर हत्येत झालं. मनोजने अंजली यांच्या डोक्याला बंदूक लावून त्यांची हत्या केली. मनोजने घटनास्थळावरून पळ काढला मात्र वाकड पोलिसांनी त्याला कात्रज परिसरात गाठून बेड्या ठोकल्या.