बुधवार, 17 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: महाड , शनिवार, 6 ऑगस्ट 2016 (11:30 IST)

तवेरा कारचे अवशेषही सापडले?

सावित्रीच्या पात्रात शोधकार्याला सुरुवात झाली आहे. नौदल आणि एनडीआरएफला सावित्री नदीत एका कारचे अवशेषही सापडले आहेत. अवशेष तवेरा कारचे असल्याचा संशय पोलिसांना आहे. मात्र, त्याला अजूनही दुजोरा मिळालेला नाही. शिवाय, बरसत असलेल्या पावसामुळं शोधकार्यात मोठे अडथळे येत आहे.
 
सावित्री नदीतील शोधमोहीमेच्या तिसऱ्या दिवशी पावसाचा अडथळा निर्माण झाला. मात्र एनडीआरएफ, नेव्ही आणि कोस्टगार्डने सकाळी नऊच्या सुमारास शोधमोहीमेला सुरुवात केली. आतापर्यंत तब्बल 22 मृतदेह सापडले आहेत.