शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सातारा , शुक्रवार, 5 ऑगस्ट 2016 (10:37 IST)

दरीत कोसळल्यानं महाबळेश्वर-पोलादपूर रोड बंद

संततधार पावसामुळे महाबळेश्वर-पोलादपूर घाटाची दुरवस्था झाली असून, प्रशासनाच्या कोणत्याही अधिकाऱ्याचे याकडे लक्ष नाही. या घाटातील रस्ता खचून एक हजार फूट खोल दरीत कोसळल्यानं मोठ्या वाहनांसाठी रस्ता बंद करण्यात आलेला आहे.महाबळेश्वर-पोलादपूर घाटातील रस्ता दरीत कोसळल्यानं महाबळेश्वर-पोलादपूर रोड वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. घाटातील रस्त्यांना भल्या मोठ्या भेगाही पडलेल्या आहेत. महाड दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्य परिवहन विभागानेही खबरदारीचा उपाय म्हणून या मार्गावरून जाणारी एसटी वाहतूकही बंद केली आहे.