गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मुंबई , शुक्रवार, 15 जुलै 2016 (14:18 IST)

पंकजा मुंडे यांना पदावरुन हटवा : राष्ट्रवादी

महिला व बालविकास विभागात झालेल्या पूरक पोषण आहार घोटाळ्याची एसीबीकडून चौकशी  होईपर्यत  पंकजा मुंडे यांना पदावरुन हटवा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसनं  केली आहे.

 विनिता सिंघल या महिला बालविकास विभागाच्या आयुक्त असून तीन महिन्यांपूर्वी त्यांची बदली होऊनही त्या अद्याप त्याच पदावर असल्याचं नवाब मलिक यांचं म्हणणं आहे. एकूण साडेसहा हजार कोटींचा हा घोटाळा पंकजा मुंडे आणि सिंघल यांच्या संगनमतानं करण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या नवाब मलिक यांनी केला आहे.
या प्रकरणाची एसीबीमार्फत चौकशी करावी. असा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.