शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. महाराष्ट्र माझा
Written By वेबदुनिया|

पवार विरुद्ध पवार

PR
शरद पवार यांनी केंद्रात आणि राज्यातील सत्तेत राष्ट्रवादी सहभागी राहील, असे विधान एका बाजूला केले असतानाच अजित पवार यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीच्या आमदारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अशी मागणी केली. हे आमदार अजित पवार यांचे समर्तक मानले जातात. त्यामुळे राष्ट्रवादीतच पवार विरुद्ध पवार असा संघर्ष सुरू झाल्याची चर्चा आहे. शरद पवार यांनी राष्ट्रवादीचे मंत्री काम पाह‍तील, असे म्हटले असले तरी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी मात्र आपल्या पदाचे राजीनामे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांच्याकडे दिले आहेत. त्याचवेळी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनीही सरकारमदून राष्ट्रवादीचे मंत्री बाहेर पडणार नाहीत. त्यामुळे रकारला धोका नसल्याचे विधान केले आहे. शरद पवार यांनी घेतलेल्या भूमिकेच्या विरोधात मंत्री आणि आमदार यांची भूमिका विसंगत कशी, असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे. आज होणार्‍या राष्ट्रवादीच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत काय घडणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.