मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. महाराष्ट्र माझा
Written By wd|
Last Modified: पुणे , मंगळवार, 29 जुलै 2014 (11:01 IST)

पुण्यात सोन्याची 12 बिस्किटे जप्त

एअर इंडियाच्या विमानाने प्रवास करणार्‍या एका महिलेला कस्टम अधिकार्‍यांनी अटक केली. तिच्याकडून 12 सोन्याची बिस्किटे (चार लाख 13 हजार रुपये किमत) जप्त केली आहेत. शंकुतला नरेश जैन असे या महिलेचे नाव आहे. 
 
दुबईवरून पुण्याला आलेल्या एअर इंडियाच्या विमानातील टॉयलेटमधील कचरापेटीत कस्टम अधिकार्‍यांना 12 सोन्याची बिस्किटे असलेले एक पाकीटात आढळून आले. चौकशी केली असता शंकुतला नरेश जैन यांचे हे पाकिट असल्याचे आढळून आले. पोलिसांनी आरोपीला अटक केले आहे. आरोपीने गुन्हा कबूल केला आहे. आरोपी महिलेवर कस्टम अँक्ट 1962 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.