शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: नाशिक , शनिवार, 27 ऑगस्ट 2016 (11:29 IST)

बनावट कागदपत्रं सादर करुन लष्कर भरती!

नाशिकच्या आर्टिलरी सेंटरमध्ये बनावट कागदपत्रं सादर करुन 4 तरुणांनी 15 दिवस प्रशिक्षण घेतल्याचं समोर आलं आहे. अहमदनगरच्या एमआयआरसी आणि नागपुरच्या गार्ड रेजिमेंट लष्करी संस्थातही बनावट कागदपत्रं तयार करुन 40 तोतया प्रशिक्षणार्थींनी घुसखोरी केल्याचा अंदाज आहे.

नाशिक पोलिसांनी पैसे घेऊन लष्करात भरती करुन देणाऱ्या दिल्लीतील 2 एजंटांसह आर्मी हेडक्वार्टरमधल्या जवानालाही अटक करुन रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. जुलै महिन्यात 4 तरुणांनी बनावट संशयास्पदरित्या घुसखोरी केल्याचं नाशिक आर्टिलरीच्या लक्षात आल्यावर हे प्रकरण चव्हाट्यावर आलं.

नाशिक पोलिसांनी लष्कर भरती करुन देणाऱ्या या रॅकेटचा पर्दाफाश केला असून दिल्लीतून लष्करी जवानासह 2 एजंटांनाही अटक केली आहे.