शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. महाराष्ट्र माझा
Written By wd|
Last Modified: नवी दिल्ली , बुधवार, 10 सप्टेंबर 2014 (10:49 IST)

महाराष्ट्राला अतिवृष्टीचा इशारा

पूर्ण जून महिना आणि जुलैच्या मध्यापर्यंत दंडी मारून जिवाला घोर लावणार्‍या पावसाने आता मात्र जोर धरला आहे. येत्या काही दिवसांत महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि गोव्यात अतिवृष्टी होईल, असा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे. जम्मू-काश्मरीमधील पुराच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने रेड अँलर्ट जारी केला आहे.
 
मध्य प्रदेशच्या पश्चिमी भागात तसेच विदर्भात नैर्ऋत्य मोसमी पाऊस पुन्हा सक्रिय झाल्याने या भागात पावसाचा जोर तुलनेने अधिक असण्याची शक्यता आहे. अंदमान-निकोबार बेटे, आसाम, मेघालय, पूर्व राजस्थान, कर्नाटकचा किनारी प्रदेश, हिमाचल आणि उत्तराखंडमध्येही मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.