शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: संगमनेर , गुरूवार, 2 जून 2016 (10:42 IST)

माफीनंतर कौमार्य प्रकरणावर पडदा

संगमनेरमधील कौमार्य तपासणी प्रकरणी मुलाने मुलीची माफी मागितल्यानंतर वधू-वराने पुन्हा एकत्र नांदण्याचा निर्णय घेतला आहे.

मुलीच्या कुटुंबीयांनीच मला जबरदस्ती कौमार्याची परीक्षा घ्यायला सांगितली आणि पंचांचं नाव सांगितलंय. याप्रकरणाचा आणि पंचांचा काहीही संबंध नाही, असा दावाही वराने केला होता. एवढंच नाही तर मुलींच्या कुटुंबीयांना हे लग्न नको आहे. त्यामुळे त्यांनी माझ्याकडे तब्बल 10 लाख रुपयांची मागणी केली. आतापर्यंत मी त्यांना 71 हजार रुपये दिल्याचंही मुलांनी सांगितलं. जातपंचायतीविरोधात आवाज उठवल्यानंतर दोन्ही बाजूंनी सामंजस्याची भूमिका घेत एकत्र नांदण्याचं ठरवलं आहे