शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. महाराष्ट्र माझा
Written By वेबदुनिया|

मी चित्रकार नाही, पण कलासक्त- भुजबळ

नाशिकमध्ये प्रफुल्ल सावंत यांच्या ब्लॉसम्स ऑफ ड्रीम्स या प्रदर्शनाचे उद्घाटन राज्याचे उप मुख्‍यमंत्री छगन भुजबळ यांच्याहस्ते करण्‍यात आले. आपण चांगले चित्रकार नसलो तरी कलासक्त असल्याचे मत या प्रसंगी त्यांनी व्यक्त केले आहे.

यापूर्वी आपण चित्रपटात अभिनय केल्याची आठवण करुन देतानाच आजही आपण कला आत्मसात करण्‍यासाठी कागदावर रेघोट्या ओढत असल्याचे भुजबळ यांनी या कार्यक्रमात स्पष्ट केले.

आपल्याला चांगले शिकण्‍याची आवड असून, यासाठी आपण आवर्जून वेळ काढत असल्याचे भुजबळ यांनी स्पष्ट केले आहे.